Thane Kalyan News: लोक रागाच्या भरात काय करतील, सांगता येत नाही. रागाच्या भरात झालेल्या घटनांचे अनेक व्हिडीओ हल्ली बघायला मिळतात. अशीच एक घटना कल्याणमध्ये घडली आहे. एका तरुणाने रागाच्या भरात दुकानामध्येच ३२००० लेहेंगा चाकून फाडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचे कारणही समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कल्याण पश्चिममध्ये ही घटना घडली आहे. मेघना मखीजा हिचे १७ जून रोजी लग्न झाले. तिने लग्नासाठी ३२००० लेहेंगा खरेदी केला होता. पण, नंतर लेहेंगा बदलण्याचा निर्णय तिने घेतला. त्यासाठी तिने कपड्याच्या दुकानाच्या मालकाला कॉल केला.
मालकाने सांगितले की, लेहेंगा परत घेतला जाणार नाही. पण, तुम्हाला बदलून हवा असेल, तर बदलून मिळेल. एका महिन्याच्या आत तुम्ही लेहेंगा बदलून घेऊ शकता. १९ जुलै रोजी मेघना दुकानात गेली. तिथे गेल्यानंतर तिचा दुकानदारासोबत वाद झाला. त्यानंतर ती रागातच घरी निघून गेली.
...तर तुलाही या लेहेंगासारखं फाडेल
मेघना घरी निघून गेली. त्यानंतर काही तासांनी तिचा पती सुमित सयानी दुकानामध्ये आला. त्याचा दुकानदारासोबत वाद सुरू झाला. त्यानंतर त्याने चाकू काढला आणि ३२००० लेहेंगा फाडला. सुमित दुकानदाराला म्हणाला की, "तू माझं ऐकलं नाही, तर मी तुलाही या लेहेंग्यासारखं फाडेल."
पोलिसांकडून तपास सुरू
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुकानदाराने पोलिसांना सांगितले की, "तो मला म्हणाला की, माझं म्हणणं ऐकलं नाही, तर या लेहेंग्यासारखं तुलाही फाडेल." दुकानदाराने सुमितने तीन लाख रुपये मागितल्याचा आरोप केला आहे.
तीन लाख रुपये दिले नाही, तर तुझ्या दुकानाची सोशल मीडियावर बदनामी करेने, अशी धमकीही सुमित सयानीने दिली असल्याचे दुकानदार पोलिसांना म्हणाला. दुकानदाराने या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.