शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

वर्तक नगर पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास तीन वर्षांतच करणार, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 14:25 IST

गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे.

ठाणे - आमदार प्रताप सरनाईक यांनी गेली 9 वर्षे पाठपुरावा केलेला वर्तक नगर पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यात आपणाला यश आले आहे. मंगळवारी झालेल्या निर्णयानुसार या पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार असून आगामी तीन वर्षात या इमारतींचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, गेली 9 वर्षे तीन सरकारांकडे पाठपुरावा केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गेलेला हा प्रश्न त्यांनी अवघ्या पहिल्याच बैठकीत मार्गी लागला. आव्हाडामुळेच पोलीस कुटुंबियांना न्याय मिळाला, याचा आपणाला अभिमान आहे, असे गौरवोद्घार ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी काढले.  

गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी बोलावल्या पत्रकार परिषदेत आव्हाड आणि आ. सरनाईक बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे देखील उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुन:र्विकासासाठी पाठपुरावा करीत होते. त्यांनी आपणाशी चर्चा केल्यानंतर आपण हा प्रश्न धसास लावला.

योगायोगाने आपण सदर खात्याचे मंत्री असल्याने त्यांच्या या पाठपुराव्याला पूर्णविराम लावणे मला शक्य झाले. हा पुन:र्विकास कोणी करावा, या मुद्यावर अनेकांचा विरोध होता. मात्र, आपण हा विरोध झुगारुन सदरचा भूखंड हा म्हाडाचा असल्याने म्हाडाच्या वतीनेच पुन:र्विकास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार 567 घरे ही पोलिसांना देण्यात येणार असून उर्वरित घरांपैकी आणखी 10 टक्के घरे पोलिसांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच, अन्य 10 टक्के घरे ही शासकीय कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. लवकरच या पुन:र्विकासासाठी वास्तूविशारद- अभियंते यांच्यासोबत आराखडा तयार करुन आगामी तीन वर्षात हे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. 

यावेळी सरनाईक यांनी, गेल्या 9 वर्षांपासून आपण वर्तक नगरमधील पोलीस वसाहतीच्या पुन:र्विकासासाठी प्रयत्नशील होतो. इमारती धोकादायक झाल्यामुळे येथील अनेक कुटुंबांचे रेंटल हाऊसिंगमध्ये स्थलांतर करण्यात आलेला आहे. फडणवीस सरकारच्या काळातही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी महिन्याभरापूर्वी पत्रव्यवहार केला. त्यांनीही म्हाडा आणि गृहखात्याची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला. एकाच बैठकीमध्ये त्यांनी येथील पुन:र्विकासाला मान्यता दिली. या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसाठी गेस्ट हाऊस, हॉल, क्लब हाऊस आदींची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. दरम्यान सरनाईक यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांचे चित्रशिल्प देऊन जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच, या वसाहतीमध्ये राहणार्‍या पोलिसांच्याा पत्नींनीदेखील आव्हाड यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र 

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्रवासी असलेली बोट उलटली; 7 जणांचा मृत्यू, 14 बेपत्ता

"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल 

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा

CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेसpratap sarnaikप्रताप सरनाईकShiv Senaशिवसेना