शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

राष्ट्रवादीच्या पक्ष मेळाव्यात गटबाजी; आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 9:18 PM

मीरा भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मीरारोडच्या तिवारी इंजिनिअरिंग महाविद्यालयात रविवारी झाला. जिल्हाध्यक्षपदी अंकुश मालुसरे यांच्या नियुक्तीवरून एक गट नाराज आहे.

मीरा रोड -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रविवारी मीरा भाईंदरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी काहींनी जिल्हाध्यक्षांसह इतरही काही मुद्द्यांवर तक्रारींचा सूर आळवल्याने शाब्दिक वादही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

मीरा भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मीरारोडच्या तिवारी इंजिनिअरिंग महाविद्यालयात रविवारी झाला. जिल्हाध्यक्षपदी अंकुश मालुसरे यांच्या नियुक्तीवरून एक गट नाराज आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीवेळी मालुसरे यांनी पक्षाला दगा दिला होता. त्यांनी काही लोकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत मांडण्यात आल्या होत्या. मालुसरे यांच्या नियुक्ती विरोधात विशेषतः माजी जिल्हाध्यक्ष संतोष तेंडुलकर व त्यांचे समर्थक सक्रिय आहेत. तर दुसरीकडे माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी राष्ट्रवादीत मालुसरे यांच्या आधी प्रवेश घेऊनदेखील त्यांना कोणती महत्त्वाची जबाबदारी दिली गेली नाही. त्या अनुषंगाने मालुसरे यांच्यासह स्थानिक राष्ट्रवादीतील गटबाजीबाबतचे पडसाद राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उमटले. 

पक्षाच्या स्थानिक प्रवक्त्याने पत्रकारांना आमंत्रित केले असताना पक्षांतर्गत वाद उफाळून येऊ लागताच पत्रकारांना बाहेर जाण्याची विनंती प्रदेशाध्यक्षांना करावी लागली. पक्षांतर्गत कुरबुरी बाजूला ठेवून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांच्या तक्रारींची नोंद घेतली असून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगतानाच पाटील यांनी पुरुष व महिला जिल्हाध्यक्ष बदलणार नसल्याचे संकेत दिले.

पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी, अशी आपली भूमिका आहे. शक्य नसल्यास एखाद्या सहकारी पक्षासोबत मिळून लढता येईल. 

भाजपच्या माजी आमदाराच्या क्लबमध्ये अनेक मोठ्या लोकांचा हात -भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वादग्रस्त सेव्हन इलेव्हन क्लब बाबत बोलताना पाटील म्हणाले,  विधानसभेत आपण हा मुद्दा उपस्थित केल्याचा परिणाम म्हणून शहरातील नागरिकांनी त्या आमदारास बदलून दुसऱ्याला निवडून दिले.  तपासात आपल्या समोर अनेक फाईल्स - कागदपत्रे आली. क्लबच्या बांधकाम परवानगीपासून ते त्याचे बांधकाम करण्यापर्यंत कांदळवन नष्ट करण्यासह अनेक कायदे, नियमांचे उल्लंघन केले गेले आहे व ते अतिशय गंभीर आहे. यात अनेक मोठ्या लोकांचा हात असल्याचा आरोप पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळत केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक