Unlock: नियम पाळायला तयार असतानाही जिमला अद्याप परवानगी का नाही?; व्यावसायिक, प्रशिक्षकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 00:28 IST2020-10-12T00:27:50+5:302020-10-12T00:28:09+5:30

GYM News: उच्च न्यायालयाने सरकारला जिम सुरू करण्याचे आदेश दिले असूनही हे क्षेत्र अद्याप सुरू होत नसल्याची नाराजी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सहचिटणीस मंदार अगवणकर यांनी व्यक्त केली.

Unlock: Why isn't Jim still allowed to follow the rules ?; Professional, trainer question | Unlock: नियम पाळायला तयार असतानाही जिमला अद्याप परवानगी का नाही?; व्यावसायिक, प्रशिक्षकांचा सवाल

Unlock: नियम पाळायला तयार असतानाही जिमला अद्याप परवानगी का नाही?; व्यावसायिक, प्रशिक्षकांचा सवाल

ठाणे : हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू झाले आहेत. दुकानांची वेळ वाढवून देण्यासाठी व्यापाऱ्यांच्या संघटना जोर धरत आहेत. परंतु, जिम सुरू करण्याबाबत सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याबाबत जिम व्यावसायिक आणि प्रशिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळायला तयार असताना जिमला परवानगी का नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.

व्यायामामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढत असताना याच क्षेत्रात सरकारने अद्याप लॉकडाऊन ठेवले आहे. कोरोना फक्त जिममुळेच पसरणार आहे का, अजून किती दिवस आमच्या पोटावर पाय ठेवणार, असे सवाल जिम व्यावसायिक आणि प्रशिक्षकांनी सरकारला केले आहेत. महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका टाकली होती. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारला जिम सुरू करण्याचे आदेश दिले असूनही हे क्षेत्र अद्याप सुरू होत नसल्याची नाराजी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सहचिटणीस मंदार अगवणकर यांनी व्यक्त केली.

जिम व्यावसायिक-प्रशिक्षकांवर उपासमार ओढवली आहे. त्यामुळे जिममालक, प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी त्यांचे भाडे, ईएमआय, शालेय फी, रेशन व वैद्यकीय बिले कशी भरतील? - मंदार अगवणकर, सहचिटणीस, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन

जिम बंद असून मला दोन लाख ५६ हजार रुपयांचे वीजबिल आले आहे. त्यात जागेचे भाडे, देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च कसा भरून काढायचा? सरकारने आमच्या क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. - विशाल सावंत, जिम व्यावसायिक

जिम सुरू करण्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. जिम सुरू व्हावी, यासाठी जिमचे सदस्य मागे लागले आहेत. सात महिन्यांपासून जिम बंद आहे. उपासमारीची वेळ आली आहे. - सचिन देशमुख, जिम व्यावसायिक, प्रशिक्षक

Web Title: Unlock: Why isn't Jim still allowed to follow the rules ?; Professional, trainer question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.