शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
3
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
4
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

मुंब्य्रात नांदते अनोखी राष्ट्रीय एकात्मता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 1:32 AM

पाच ठिकाणी एकाच मंडपात गणेशोत्सव अन् मोहरम : आरती-मजलिस एकाच माइकवर

कुमार बडदे मुंब्रा: ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना’ या काव्यपंक्तीनुसार वेळोवेळी वागून राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण देणाऱ्या मुंब्य्रातील रहिवाशांनी पुन्हा एकदा एकाच मंडपात तसेच जवळजवळ गणेशोत्सव आणि मोहरमचे कार्यक्र म सादर करून नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अनोखी राष्ट्रीय एकात्मता दाखविली आहे.

अनोख्या राष्ट्रीय एकात्मतेमुळे एका ठिकाणी तर एकाच स्पिकरमधून आरती आणि मजलिसचे (मोहरनिमित्त साजरा होणारा धार्मिक कार्यक्र म) सूर बाहेर निघत असल्याचे विरळ दृश्य दिसत आहे. नेहमीच एक दुसºयाच्या धर्माचा, भावनांचा आदर करून सण, उत्सव साजरे करणारे येथील हिंदू-मुस्लिम सध्या पाच ठिकाणी गणपती आणि मोहरमचे कार्यक्र म साजरे करत आहेत.नेहमीच संयमाने वागून येथील नागरिकांनी वेळोवेळी एकोपा जपला आहे. दोन्ही धर्मातील रु ढी,परंपरा याचा आदर करण्याची यापूर्वीची परंपरा कायम ठेवण्याच्या हेतूने येथील काही गणेश मंडळांनी आणि मोहरम कमेटीने गणेश उत्सव आणि मोहरमचे कार्यक्र म एकाच मंडपात साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आनंद कोळीवाडा येथील गणेश मित्र मंडळ तसेच विश्व मित्र मंडळ आणि चर्णीपाडा येथील एकता मित्र मंडळाचे पदाधिकारी व मोहरम कमेटीचे पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर बैठक घेतली. त्यात झालेल्या चर्चेअंती दोन्ही कडच्या पदाधिकाºयांनी एकाच मंडपात गणपती उत्सव तसेच मोहरमचे कार्यक्र म करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती एका पोलीस अधिकाºयांनी दिली.पोलीस आयुक्तांनी केला सत्कारच्गतवर्षीही त्यांनी राबवलेल्या या अनोख्या कल्पनेबद्दल काही मंडळाचा आणि मोहरम कमेटीमधील पदाधिकाºयांचा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते नुकताच ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या समारंभात सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. दोन्ही समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांनी दाखवलेल्या या सामजस्यांबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.च्गणेश मित्र मंडळाच्या मंडपात तर आरती तसेच मोहरम निमित्त होणारी मजलिस आणि थेट प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमासाठी दररोज एकाच माईकचा आणि स्पिकरचा वापर करण्यात येतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ सावंत आणि सल्लागार गिरिष आहिरे तसेच कार्यकर्ते प्रदीप देवरु खकर आदींनी लोकमतला दिली.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवthaneठाणे