उल्हासनगर पालिका आयुक्त आव्हाळे यांनी विकासकामांची पाहणी करताना डोक्यावर मारला हात, काय घडलं?

By सदानंद नाईक | Updated: February 24, 2026 21:11 IST2026-02-24T20:55:08+5:302026-02-24T21:11:51+5:30

पाहणी दरम्यान त्यांनी डोक्यावर हात मारल्याचे एका फोटोत दिसत आहेत

Ulhasnagar Municipal Commissioner Manisha Avhale seeing hitting hand on head while inspecting development works | उल्हासनगर पालिका आयुक्त आव्हाळे यांनी विकासकामांची पाहणी करताना डोक्यावर मारला हात, काय घडलं?

उल्हासनगर पालिका आयुक्त आव्हाळे यांनी विकासकामांची पाहणी करताना डोक्यावर मारला हात, काय घडलं?

सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी कॅम्प नं-४ व्हिटीसी ग्राऊंड येथील सेंट्रल व्हॅक्सिन स्टोअर तसेच नागरी आरोग्य केंद्र व प्रभाग क्र-१५ मधील विकासकामांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी डोक्यावर हात मारल्याचे एका फोटोत दिसत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

उल्हासनगर पूर्वेतील व्हिटीसी ग्राऊंड येथील आरोग्य केंद्र व विकासकामांच्या पाहणीसाठी आयुक्त मनिषा आव्हाळे रस्त्यावर आल्यावर नागरिकांनी त्यांना विविध समस्या सांगितल्या. आयुक्त आव्हाळे यांनी प्रभाग क्र-१५ चे नगरसेवक अरुण अशान, इंदिरा पाटील, समाजसेवक अमर जग्याशी, नितीन सपकाळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. प्रभागातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्तेदुरुस्ती व पाईपलाईन टाकण्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांची गुणवत्ता, प्रगती तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.

महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या पाहणी दौऱ्यात उपायुक्त अनंत जावदवार, वैद्यकीय विभागाच्या अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांच्यासह स्थानिक अधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्याने ठेकेदार व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून विकासकामांची पाहणी करताना आयुक्त मनिषा आव्हाळे या डोक्याला हात मारून घेताना दिसल्या. यावरून त्यांनी विकास कामांबाबत नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे.

Web Title : उल्हासनगर आयुक्त ने विकास कार्यों का निरीक्षण किया, असंतोष व्यक्त; क्या हुआ?

Web Summary : उल्हासनगर आयुक्त मनीषा आव्हाले ने टीकाकरण केंद्र और सड़क मरम्मत सहित विकास कार्यों की समीक्षा की। निवासियों ने चिंता व्यक्त की, और आव्हाले ने पार्षदों के साथ बातचीत की। उन्हें अपने सिर पर हाथ रखकर देखा गया, कथित तौर पर काम की प्रगति और गुणवत्ता से असंतोष व्यक्त किया।

Web Title : Ulhasnagar Commissioner Inspects Development, Expresses Displeasure; What Happened?

Web Summary : Ulhasnagar Commissioner Manisha Awhale reviewed development works, including a vaccination center and road repairs. Residents voiced concerns, and Awhale interacted with corporators. She was seen with her hand on her head, reportedly expressing dissatisfaction with the progress and quality of the work.