कोंडेश्वरच्या कुंडात दोन तरुण बुडाले

By Admin | Updated: July 3, 2016 01:57 IST2016-07-03T01:57:46+5:302016-07-03T01:57:46+5:30

पाण्याचा अंदाज न आल्याने कोंडेश्वर येथील कुंडात बुडून एका तरु णाचा शनिवारी मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.

Two youths lost in Kondeshwar Kunda | कोंडेश्वरच्या कुंडात दोन तरुण बुडाले

कोंडेश्वरच्या कुंडात दोन तरुण बुडाले

बदलापूर : पाण्याचा अंदाज न आल्याने कोंडेश्वर येथील कुंडात बुडून एका तरु णाचा शनिवारी मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.
अंबरनाथ येथील एक ग्रुप कोंडेश्वर येथे पावसाळी पर्यटनासाठी आला होता. जोरदार पावसातही ते कुंडात पोहण्याचा आनंद लुटत होते. परंतु, खोल असलेल्या कुंडातील पाण्याचा अंदाज न आल्याने लक्ष्मण भीमा पवार (३७) याचा बुडून मृत्यू झाला, तर कल्याण येथून आलेल्या अनिकेत काळे याची प्रकृती गंभीर आहे. त्याला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोंडेश्वर येथील कुंड पोहण्यासाठी धोकादायक आहे. या कुंडात उतरू नये, असा इशारा देणारे फलक येथे लावण्यात आले आहेत. तसेच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार सांगूनही पर्यटक चुकीचे वर्तन करतात. त्यामुळे तेथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तीन दिवसांपूर्वीच कळवा येथील एका तरुणीचाही याच कुंडात बुडून मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Two youths lost in Kondeshwar Kunda