ठाण्यात कंटेनरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यु

By जितेंद्र कालेकर | Updated: March 25, 2019 00:14 IST2019-03-24T23:49:10+5:302019-03-25T00:14:23+5:30

वाशी ते ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे जाणाऱ्या एका कंटेनरच्या धडकेमध्ये कुणाल गोडबोले या स्कूटर स्वाराचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास खोपट भागात घडली. पसार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले.

 Two-wheeler dies in a container shackle in Thane | ठाण्यात कंटेनरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यु

राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देखोपट येथील घटनाअपघातानंतर कंटेनरचा चालक पसारराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: कंटेनरच्या धडकेमध्ये स्कूटरवरुन जाणाऱ्या कुणाल गोडबोले (२७, रा. चरई) या तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास घडली. अपघातानंतर कंटेनरचा चालक मात्र पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने चालकाच्या अटकेची मागणी करीत जिल्हा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाशीवरुन आलेला हा कंटेनर ठाण्याच्या वागळे इस्टेट भागाकडे जात होता. तो खोपट बस थांबा येथून कॅडबरी कंपनीच्या दिशेने भरघाव वेगाने जात असतांना कुणालच्या दुचाकीला त्याची जोरदार धडक बसली. या अपघातात कुणालच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याच्या मृत्युस जबाबदार असलेल्या कंटेनर चालकाला तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी खोपट या अपघातस्थळी आणि जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कुणालचे नातेवाईक आणि ठाणेकरांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असून ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल गावित यांनी सांगितले.

Web Title:  Two-wheeler dies in a container shackle in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.