ठाण्यात ट्रकच्या धडकेत टेम्पो चालकासह दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 21:24 IST2021-04-22T21:23:33+5:302021-04-22T21:24:20+5:30
ठाण्यात ट्रकच्या धडकेमध्ये टेम्पोमधील चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाल्याची घटना गुरवारी सायंकाळी घडली. या दोघांनाही ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गायमुख येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यात ट्रकच्या धडकेमध्ये टेम्पोमधील चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाल्याची घटना गुरवारी सायंकाळी घडली. या दोघांनाही ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा रोड ते वाशीच्या दिशेने घोडबंदर रोडवरील गायमुख येथून हा टेम्पो गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जात होता. त्याचवेळी घोडबंदर ते मीरा रोडच्या दिशेने समोरुन आलेल्या एका ट्रकची या टेम्पोला जोरदार धडक बसली. शोएब (३८) आणि एहतास मुलहक (३२) हे दोघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाने धाव घेत मदतकार्य केले. वाहतूक शाखेने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.