मीरा भाईंदर मध्ये अल्पवयीन मुली वर बलात्काराच्या दोन घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 22:51 IST2020-02-08T22:50:53+5:302020-02-08T22:51:28+5:30
दुसरी घटना भाईंदर पश्चिमेस घडली आहे. 8 वर्षांची मुलगी खेळत

मीरा भाईंदर मध्ये अल्पवयीन मुली वर बलात्काराच्या दोन घटना
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या दोन घटना घडल्या असून दोन्ही घटने प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ( 51 ) वर्षाच्या अनिल जेटली नावाच्या नराधमाने मुलगी घरात एकटी असताना 3 फेब्रुवारी रोजी तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार लक्षत आल्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दुसरी घटना भाईंदर पश्चिमेस घडली आहे. 8 वर्षांची मुलगी खेळत असताना उमाशंकर गुप्तां ( 43 ) या भाजी विक्रेत्याने तिला चॉकलेट च्या आमिषाने बोलवून घेत तिच्यावर बलात्कार केला. मुलीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुरुवारी आरोपीस अटक करण्यात आली आहे. या दोन घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे.