भाईंदर मध्ये दोन अट्टल दुचाकी चोरांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 20:47 IST2023-04-11T20:47:08+5:302023-04-11T20:47:49+5:30
नवघर हद्दीतील ३ तर नायगाव मधील १ असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.

भाईंदर मध्ये दोन अट्टल दुचाकी चोरांना अटक
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अट्टल आरोपींना पोलिसांनी अटक करून ५ दुचाकी जप्त केल्या आहेत. नवघर हद्दीतील ३ तर नायगाव मधील १ असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
शामलाल गुप्ता यांची दुचाकी भाईंदर पूर्वेच्या साई आराधना इमारती समोरून चोरीला गेली होती. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक अभिजित लांडे सह भुषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, जयप्रकाश जाधव, ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव यांच्या पथकाने दुचाकी चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास सुरु केला.
पोलिसांनी गुप्त बातमीदारा व तांत्रिक विश्लेषणा द्वारे दुचाकी चोरी करणारे आरोपी शुभम निरज सिंग (२५) रा. जय भवानी नगर, दहिसर पूर्व व ओम विक्रम सोळंकी (१९) रा. शिर्डी नगर, भाईंदर पूर्व यांना ८ एप्रिल रोजी अटक केली. चोरी केलेल्या ४ व गुन्हे करतांना वापरलेली १ अश्या ५ दुचाकी आरोपीं कडून हस्तगत केल्या असून त्याची किंमत सुमारे दीड लाख इतकी आहे.