ठाणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली कृषी अभ्यासासाठी ॲग्राे फार्मकडे

By सुरेश लोखंडे | Published: December 12, 2023 07:53 PM2023-12-12T19:53:49+5:302023-12-12T19:54:13+5:30

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वाढत्या शहरीकरणामुळे जिल्ह्यातील शेती संपुष्ठात येत आहे. त्याचा दुरगामी परिणाम हाेऊ नये म्हणून सावध झालेल्या ...

Trips of school students in the district to Agra Farms for agricultural study | ठाणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली कृषी अभ्यासासाठी ॲग्राे फार्मकडे

ठाणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली कृषी अभ्यासासाठी ॲग्राे फार्मकडे

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वाढत्या शहरीकरणामुळे जिल्ह्यातील शेती संपुष्ठात येत आहे. त्याचा दुरगामी परिणाम हाेऊ नये म्हणून सावध झालेल्या शाळांकडून विद्यार्थ्याची सहल ग्रामीण, दुर्गम भागातील शेती, ॲग्राे फार्म हाऊसला काढून विद्यार्थ्याना शेतीचे महत्व पटवून दिले जात आहे. यास अनुसरून रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोळखांब विद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल साई अॲग्राे फाॅर्ममध्ये काढून विद्यार्थ्याना रोपांचा अभ्यास, म्हैसपालन व दुग्ध उत्पादन , सोलर पंप, गांडूळ खत निर्मिती, शेण खत वापर, औषधी वनस्पती व व्यवस्थापन,भाजी उत्पादन, शोभेची झाडं, रान झाडं , फुल उत्पादन व व्यवस्थापन आणि त्यातील आर्थिक गुंतवणूक व वार्षिक उत्पन्नाचे धडे देत त्यनाां भविष्याची जाणीव करून दिली.

सध्या कृषी संबंधित सखोल ज्ञान मिळावे यासाठी विविध उपाययाेजना सुरू आहे. त्यास वाढते नागरिकरण व वाढती लाेकसंख्या कारणीभूत आहे. देशात सर्वाधिक महापालिका असलेला ठाणे जिल्हा नागरिकरणाने वेढला आहे. त्यातमुळे शेती नेष्ठ हाेऊन गगन चुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. या शहराना लागणारे अन्नाधान्य, ताजा भाजीपाला, दूध आदी शेतीशी संबंधीत उत्पादनांची शहरांना गरज आहे. या गरजापूर्ण करणे शक्य व्हावे म्हणून शेतीचे महत्व पटवून देत सहलीच्या माध्यमातून या विद्यार्थ्याना शेतीचे महत्व व त्यावर शैक्षणिक धडे दिले जात आहे. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोळखांब विद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यालयाचे प्राचार्य एम.के.कोंगेरे यांनी विद्यार्थ्याना सखाेल मार्गदर्शन केले.

या षिफॉर्म येथील पॉलीहाऊसमधील विविध प्रकारच्या रोपांचा अभ्यास, म्हैसपालन व दुग्ध उत्पादन , सोलर पंप, रोपांची निगा, गांडूळ खत निर्मिती, शेण खत वापर, औषधी वनस्पती व व्यवस्थापन, शोभेची झाडं, रान झाडं , फुल उत्पादन व व्यवस्थापन, भाजी उत्पादन व व्यवस्थापन.सदर फार्म मधील आर्थिक गुंतवणूक व वार्षिक उत्पन्न तसेच कृषी विभागाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती कृषी तज्ञांसह साई अँग्रो फॉर्मचे मालक ॲड. बबन हरणे यांनी विद्यार्थ्यांना दिली.

Web Title: Trips of school students in the district to Agra Farms for agricultural study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.