धावत्या रिक्षावर झाड पडून चालकासह प्रवाशाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 00:58 IST2021-04-21T23:41:36+5:302021-04-22T00:58:07+5:30
रिक्षांमध्ये प्रवासी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मयत चालकाचे नाव अद्यापही समजू शकले नसून झाड हटविण्याचे काम सुरू आहे.

धावत्या रिक्षावर झाड पडून चालकासह प्रवाशाचा मृत्यू
ठाणे : मासुंदा तलाव येथील डॉ. मूस रोड येथून धावणाऱ्या रिक्षावर उन्मळून झाड पडल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यामध्ये रिक्षाचालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तसेच रिक्षांमध्ये प्रवासी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मयत चालकाचे नाव अद्यापही समजू शकले नसून झाड हटविण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. चालक आणि प्रवासी या दोघांची नावे समजू शकली नाहीत.