बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीचा सामना; परीक्षार्थ्यांसाठी वाहतूक पोलिस बनले ‘देवदूत’, रायडर्सने दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 01:21 IST2026-02-11T01:20:18+5:302026-02-11T01:21:18+5:30

तर काहींना थेट वाहतूक रायडर्सच्या मदतीने परीक्षा केंद्रावर साेडविण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

Traffic jam on the first day of 12th exams; Traffic police became 'angels' for the examinees, riders extended a helping hand | बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीचा सामना; परीक्षार्थ्यांसाठी वाहतूक पोलिस बनले ‘देवदूत’, रायडर्सने दिला मदतीचा हात

बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीचा सामना; परीक्षार्थ्यांसाठी वाहतूक पोलिस बनले ‘देवदूत’, रायडर्सने दिला मदतीचा हात


ठाणे : बारावी परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजीच्या परीक्षेला जाताना ठाण्यातील परीक्षार्थ्यांना वाहतूक काेंडीला सामाेरे जावे लागले. घाेडबंदर भागात कासारवडवली, मानपाडा, कापूरबावडी, माजीवडा आणि वागळे इस्टेट परिसरात सकाळी ९:३० ते १०:३० या कालावधीत वाहतूक काेंडी हाेती. सकाळी १०:१० ते १०:३० या २० मिनिटांच्या कालावधीत काेंडी साेडविण्यासाठी वाहतूक शाखेकडे मदतीसाठी २५ पेक्षा जास्त काॅल आले. यातील अनेकांची काेंडीतून सुटका करण्यात आली. तर काहींना थेट वाहतूक रायडर्सच्या मदतीने परीक्षा केंद्रावर साेडविण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एचएससी) २०२६ च्या बारावी परीक्षेचे पेपर १० फेब्रुवारी ते १८ मार्च यादरम्यान हाेत आहे. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ या सत्रात परीक्षेचा पहिलाच पेपर हाेता. सकाळची ठाण्यातून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या वाहनांची वेळ आणि परीक्षेची वेळ साधारण एकच असल्याने ठाणे शहर वाहतूक शाखेनेही एक आठवड्यांपूर्वीच त्याचे नियाेजन केले हाेते. ठाणे शहर वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी परीक्षेच्या दिवशी वाहतूक कोंडीसह काेणत्याही कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलिस सज्ज राहणार असल्याची माहिती दिली हाेती. त्यानुसार, रस्त्यांवर ५४ रायडर्स तैनात केल्याचे सांगून ट्रॅफिक कंट्रोलसह व्हॉट्सॲप क्रमांक दिले होते.

१३ काॅल्सची नाेंद
परीक्षेमुळे सकाळी ९:३० पासून परीक्षार्थ्यांची वाहने रस्त्यावर आली. घाेडबंदर मार्गावरून ठाण्यातील नाैपाडा, वागळे इस्टेट, माजीवडा, राबाेडी आदी भागातील परीक्षा केंद्रांवर जाणारी अनेक वाहने ही घाेडबंदर, माजीवडा, बाळकूम या भागात तर नाैपाड्यातून घाेडबंदरकडे जाणारी वाहनेही काेंडीत अडकली हाेती. त्यामुळे सकाळी १० वाजून १० मिनिटांपासून ते १०:३० या २० मिनिटांत १० पेक्षा अधिक काॅल्स वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाला आले. यातील १३ काॅल्सची नाेंद झाली. संख्या वाढल्यामुळे इतर काॅल्सची नाेंदणी झाली नाही. यामध्ये बाळकूममधून तीन, माजीवडा येथून दाेन, वागळे इस्टेट राेड क्रमांक १६ येथून सहा काॅल्स नियंत्रण कक्षात आले. राेड क्रमांक १६ येथे टेम्पाे बंद पडला हाेता. ताे बाजूला करण्यात आला. इतर ठिकाणी वाहतूक सुरळीत केल्याचा दावा वाहतूक शाखेने केला. घाेडबंदर राेड आणि बाळकूम याठिकाणी वाहतूक काेंडीचा परीक्षार्थींना फटका बसल्याची माहिती या भागातील पालकांनी दिली.

Web Title : परीक्षा के दिन ट्रैफिक जाम; ठाणे पुलिस, राइडर्स ने छात्रों की मदद की।

Web Summary : पहली परीक्षा के दिन ठाणे के एचएससी छात्रों को ट्रैफिक जाम का सामना करना पड़ा। पुलिस और राइडर्स ने फंसे हुए छात्रों की मदद की, ताकि वे समय पर परीक्षा केंद्रों पर पहुंच सकें। मुख्य रूप से घोड़बंदर रोड, बाल्कुम और माजीवड़ा क्षेत्रों से मदद के लिए तेरह कॉल पंजीकृत किए गए।

Web Title : Traffic snarls on exam day; Thane police, riders help students.

Web Summary : Traffic congestion troubled Thane's HSC students on the first exam day. Police and riders assisted stranded students, ensuring they reached exam centers on time. Thirteen calls for help were registered, mainly from Ghodbunder Road, Balkum, and Majiwada areas.