भिवंडीतील तरुणाच्या हत्ये प्रकरणी उपशहरप्रमुख कैलास धोत्रे सह एकूण सात जणांना अटक

By नितीन पंडित | Published: February 22, 2024 05:03 PM2024-02-22T17:03:57+5:302024-02-22T17:05:12+5:30

एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली  केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या सात वर पोहचली आहे.

total of seven people including deputy city chief kailas dhotre have been arrested in connection with the murder of a youth in bhiwandi | भिवंडीतील तरुणाच्या हत्ये प्रकरणी उपशहरप्रमुख कैलास धोत्रे सह एकूण सात जणांना अटक

भिवंडीतील तरुणाच्या हत्ये प्रकरणी उपशहरप्रमुख कैलास धोत्रे सह एकूण सात जणांना अटक

नितीन पंडित, भिवंडी: संकेत भोसले हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यासोबत दोघा आरोपींना बुधवारी रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. तर एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली  केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या सात वर पोहचली आहे.

 १४ फेब्रुवारी रोजी शुल्लक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे त्याचा मुलगा देवा व इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने जबर जखमी झाला होता.या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल होते.उपचारा सुरू असताना संकेत भोसले याचा मृत्यू झाला.त्या नंतर  पोलिसांनी संकेत भोसले यास जबर मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात कैलास धोत्रे याचे साथीदार करण लष्कर,दिनेश मोरे व चंदन गौड यांना या पूर्वी अटक केली होती.तर आता हत्येचा गुन्हा दाखल झाल्या नंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी बनविलेल्या पोलिस पथकाने रात्री उशिरा मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे,आकाश जाधव,विशाल साबळे यांना अटक केली आहे.तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे यास अटक केली आहे.दरम्यान हत्या करणारे आरोपी यांना अटक होत नाही तोपर्यंत मयत संकेत भोसले याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी कुटुंबीयांसह स्थानिकांनी केली होती.त्यानंतर पोलिसांनी गांभीर्य बाळगून या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके बनवली होती.त्यांना या गुन्ह्यातील एकूण सात गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून या गुन्ह्यातील अजून काही फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

 गुरुवारी दुपारी कैलास धोत्रे,आकाश जाधव,विशाल साबळे यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता या तिघांना २६ फेब्रुवारी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.तर गुरुवारी सकाळपासूनच वऱ्हाळदेवी नगर,धामणकर नाका, न्यायालय व सब जेल परिसरात पोलोसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: total of seven people including deputy city chief kailas dhotre have been arrested in connection with the murder of a youth in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.