शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

आज ढोल वाजणार!

By admin | Updated: March 24, 2017 01:10 IST

गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथकांचा समावेश करण्याचा विषय शुक्रवारी निकाली निघण्याची शक्यता आहे.

ठाणे : गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथकांचा समावेश करण्याचा विषय शुक्रवारी निकाली निघण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चेसाठी पथकांना बोलवल्याचे आयोजक सांगत असले तरी गुरूवारी रात्रीपर्यंत निमंत्रण नसल्याने पथकांनी या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी मनसेने मात्र ढोल-ताशा पथकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याची भूमिका जाहीर केली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या पथकांना पाठिंबा देत निर्णय बदलल्याचे सांगितले, तर कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाऊन आयोजकांनी स्वत:वर गुन्हे कसे दाखल करून घ्यायचे असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केल्याने त्या पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याचे दिसून आले.स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथके नसतील, असा निर्णय घेतल्याचे ठाण्यातील आयोजकांनी जाहीर केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. त्यानंतर सारवासारव करत त्यांनी पथकांशी चर्चा करण्याची भूमिका जाहीर केली. शिवाय स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्यांनी त्यातील कायदेशीर कारवाईची जबाबदारी आमच्यावर असेल, असे हमीपत्र भरून देण्याचा त्यांचा मुद्दा अनेक मंडळांच्या पचनी पडलेला नाही. ठाण्यातील तरूणाईनेही ढोल-ताशा पथकांचीच भूमिका उचलून धरली असून ही पथके नसतील, तर स्वागतयात्रेला काय अर्थ आहे, असा सवाल केला. ‘लोकमत’ने या विषयाशी संबंधित सर्व बाजू मांडल्यानंतर गेले दोन दिवस सोशल मीडियावर यावरून चर्चेला तोंड फुटले आहे. मनसेने मात्र या वृत्ताची दखल घेत ढोल-ताशा पथकांसोबत उभे राहण्याची तयारी दाखवली. प्रसंगी चौकाचौकात ढोल वाजवून नववर्ष स्वागतयात्रेचे स्वागत करु, अशी भूमिका घेतली आहे. समाजातील काही लोकांनी सुसंस्कृतपणाचा मुखवटा घेतल्याने, अशा लोकांमुळेच पारंपरिक वाद्ये आणि वादनकला लुप्त होण्याची वेळ आल्याचा टोला मनसेचे शहरअध्यक्ष अविनाश जाधव यांनी लगावला. पण असे लोक समाजात एक टक्का आहेत. उर्वरित ९९ टक्के लोक कार्यक्रमाची सुरूवात ढोल-ताशा पथकानेच करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)