शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळा रेल्वे फाटक क्रॉसिंग रस्ता ठरतोय अपघातास कारणीभूत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 20:54 IST

टिटवाळा रेल्वे फाटकातील क्रॉसिंग रोड हा संपूर्ण खराब होऊन त्यातील खडी मोठे दगडवर आल्याने या रस्त्यावरुन दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

उमेश जाधव

टिटवाळा:  टिटवाळा रेल्वे फाटकातील क्रॉसिंग रोड हा संपूर्ण खराब होऊन त्यातील खडी मोठे दगडवर आल्याने या रस्त्यावरुन दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्याचबरोबर या रस्त्यात ट्रकमध्ये पडलेल्या उंच सखल भागांमुळे अनेक दुचाकी आणि चारचाकी अडकून राहिल्याने ट्राफिक झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.टिटवाळा रेल्वे फाटकातील क्रॉसिंग रोडवर होणारी वाहतूक कोंडी आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे गाड्या स्लिप होऊन लहान-मोठे अपघात होण्याच्या घटना ही आता नित्याचीच बाब झाली आहे. अनेक वेळा शाळेच्या बसेस, रुग्णवाहिका या फाटकात अडकल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच रुग्णवाहिकेतील रुग्णांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. तर सोशल मीडियावर देखील या रस्त्याबाबत पोस्ट शेयर करण्यात येत आहेत.याबाबत शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख शिवसेना किशोर शुक्ला आणि शिवसेनेचे अनिल महाजन यांनी रेल्वेचे संबंधित अधिकारी यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असता सदर कामाबाबत  तातडीने दखल घेत या गंभीर बाबींकडे गांभीर्याने रेल्वेने कामाला सुरुवात करण्यात येई, असे सांगण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान २०१७ मध्ये देखील  शिवसेनेचे अनिल महाजन यांनी  याच बाबीसाठी पाठपुरावा केल्यानंतर हा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाला प्रत्येकवेळी ही बाब लक्षात आणून देण्यापेक्षा स्वत: हून त्यांनी याबाबत लक्ष घालून वेळोवेळी दुरुस्ती केली पाहिजे, अश्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.