शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरसाठी बांधला; मातीमाफियांनी चोरला

By admin | Updated: October 24, 2016 02:01 IST

कांदळवन, पाणथळ व सीआरझेडचे उल्लंघन करून लोकवस्ती नसतानाही केवळ बिल्डर लॉबी व राजकारण्यांच्या अडकलेल्या अब्जावधी रुपयांच्या भूखंडांपर्यंत जाण्याकरिता

धीरज परब, मीरा रोडकांदळवन, पाणथळ व सीआरझेडचे उल्लंघन करून लोकवस्ती नसतानाही केवळ बिल्डर लॉबी व राजकारण्यांच्या अडकलेल्या अब्जावधी रुपयांच्या भूखंडांपर्यंत जाण्याकरिता मार्ग तयार व्हावा, याकरिता कनकिया येथे पावसाळ्यापूर्वी सुमारे ५ कोटी खर्च करून महापालिकेने बांधलेल्या रस्त्याचा बराच भाग मातीमाफियांच्या हैदोसामुळे चक्क गायब झाला आहे. उर्वरित रस्त्याचा वापर केवळ वाहन पार्किंगसाठी होत असून त्याचीही दुरवस्था असल्याने जनतेचे कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत. ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये जून महिन्यातच कनकिया येथे पालिकेने अनावश्यक रस्ता बांधल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विकास आराखड्यात जेसलपार्क ते घोडबंदर हा खाडीकिनाऱ्यालगत प्रस्तावित रस्ता कांदळवन, पाणथळ व सीआरझेडमुळे बाधित आहे. मात्र, उच्च न्यायालयाचे आदेश व कायदा धाब्यावर बसवत पालिका अधिकारी व काही बिल्डर, राजकारणी यांनी संगनमताने पर्यावरणाचा ऱ्हास करून काही ठिकाणी कच्चा रस्ता तयार केला. केवळ व्यवस्थित मार्ग नसल्याने अडकलेल्या अब्जावधी रुपये किमतीच्या भूखंडांना ‘अ‍ॅक्सेस’ तयार होऊन ते मोकळे करून घेण्याची त्यांची धडपड सुरू आहे. रस्त्याला मंजुरी मिळाली नसतानादेखील महापालिकेने कनकिया ते नवघर असा ३० मीटर लांबीचा रस्ता ५ कोटी रुपये खर्च करून तयार केला.रस्ता होणार, हे ग्राह्य मानून लागलीच त्या भूखंडावर बांधकाम परवानग्या देण्याचा सपाटा पालिकेने लावला आहे. भाजपाच्या एका बड्या नेत्याशी संबंधित कंपनी तेथे क्लब हाउस उभारत आहे. शिवाय, कनकिया जेट्टीचा ठराव करून त्यालगतचे भूखंड विकासाकरिता मोकळे करण्याचाही घाट घातलाआहे. मात्र, या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या मातीमाफियांनी के.डी. एम्पायरपासून नवघरकडे जाणारा नवाकोरा रस्ताच गायब केला आहे. श्रीजी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या रस्त्याचे नामोनिशाणही दिसत नाही. तिवारी महाविद्यालयासमोरील व आजूबाजूच्या परिसरातला रस्ता केवळ वाहन पार्किंगसाठीच वापरला जात आहे. परिणामी, हा ९० फुटी डांबरी रस्ताबांधणीसाठी पालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत. संत होम शाळेजवळ कांदळवनात रस्ता व गटार बांधून पालिकेने पर्यावरणाचा ऱ्हास केला, तर पाणथळ व कांदळवन परिसरात भराव टाकून नव्याने डांबरी रस्ता व गटाराचे बांधकाम केले.