भिवंडीत दोन कारवायांमध्ये तीन किलो गांजा जप्त 

By नितीन पंडित | Updated: April 15, 2024 16:55 IST2024-04-15T16:54:45+5:302024-04-15T16:55:42+5:30

शहरात गांजा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून पोलिसांनी दोन दिवसात केलेल्या कारवाईत तीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

three kg ganja seized in two operations in bhiwandi | भिवंडीत दोन कारवायांमध्ये तीन किलो गांजा जप्त 

भिवंडीत दोन कारवायांमध्ये तीन किलो गांजा जप्त 

नितीन पंडित, भिवंडी: शहरात गांजा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून पोलिसांनी दोन दिवसात केलेल्या कारवाईत तीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. निजामपुरा पोलिस ठाणे हद्दीत नरेंद्र बागल यांची चाळ,खोणी गाव काही इसम गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला असता तेथे धनंजय उर्फ धन्या कैलास पवार वय ३१ रा.संगमपाडा व कुणाल राजेश खेताडे वय २४ रा.कोंबडपाडा यांच्या ताब्यात २ किलो ४०० ग्राम वजनाचा गांजा विक्री करीता स्वतः जवळ बाळगलेला आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा सह मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ७२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत हॉटेल व्यवसायिक महिला सोनी नफीजअली सय्यद वय ३४ वर्षे हिने लाहोटी कंपाऊंड येथील मोकळ्या जागेत शिवनेरी हॉटेल येथे ५४० ग्रॅम वजनाचा ५ हजार ४०० रुपये किमतीचा गांजा विक्री करण्या साठी आपल्या ताब्यात बाळगलेला आढळून आल्याने भिवंडी शहर पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: three kg ganja seized in two operations in bhiwandi