शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील तीन चौपाट्या डिसेंबरअखेर होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:25 IST

विरंगुळा लांबल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्मार्ट सिटीअंतर्गत गंटागळ्या खाणाऱ्या ४२ प्रकल्पांपैकी काही प्रकल्प या वर्षअखेर पूर्ण होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे. त्यानुसार यातील कोलशेत, नागला बंदर आणि साकेत येथील चौपाटींची कामे डिसेंबरअखेर मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले. यात कोलशेत - १ किमी, नागलाबंदर १.४० किमी, कावेसार- ३.७० किमी, साकेत- २५० मीटर अशी या चौपाटींची कामे असणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून स्मार्ट सिटीचे प्रकल्प गंटागळ्या खाताना दिसत होते. परंतु, आता कुठे काही प्रकल्प पूर्णत्वाकडे वळू लागले आहे.  मनपाने खाडीकिनारा विकसित करण्यासाठी (वॉटर फ्रंट डेव्हल्पमेन्ट) हा प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत खाडीचा विकास करताना येथे बोटिंग, जलक्रीडा, जलवाहतूक, खाडी किनाऱ्यावर मॅंग्रोज टेल्स, प्रॉमिनेड्स, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पब्लिक प्लेसेस, मिनी पिकनिक सेंटर आदी बाबींचा समावेश आहे.यात ठाणे शहर, खारेगाव, साकेत, बाळकुम, कोलशेत, गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, कावेसार, रेती बंदर, पारिसक चौपाटी, मुंब्रा व दिवा आदी ठिकाणच्या किनाऱ्याचा या माध्यमातून विकास होणार आहे. चार ठिकाणच्या या कामांसाठी २२४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी  पूर्वेतील खाडीकिनारी येथे वॉटर फ्रन्टच्या कामाला सुरुवात झाली. परंतु, या कामाबाबतही आक्षेप घेण्यात आला होता. तर कोलशेत नागला बंदर, कावेसार-वाघबीळ येथे हा प्रकल्पासाठी मनपाने हरकती मागविल्या नाहीत, असे असतानाही ठेकेदाराला मात्र कामाची वर्कऑर्डर दिली. त्यामुळेही वादंग निर्माण झाला होता. परंतु आता वादंगावर पडदा टाकून मनपाने या प्रकल्पांचे कामे मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू करून डिसेंबरअखेर यातील कोलशेत, नागला बंदर आणि साकेत चौपाटीचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा केला आहे.

पारसिक चौपाटीचा ५० टक्के हिस्सा वगळलाठाणे : सुमारे ९० कोटी रुपये खर्चून सुरू असलेले पारसिक आणि मासुंदा तलाव चौपाटीचे काम प्रगतीपथावर आहे. यातील पारसिक चौपाटीचा ५० टक्के हिस्सा वगळून तिचे काम करण्यात  येत आहे. पारसिक चौपाटीला ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या चौपाटीचे काम मार्गी लागणे गरजेचे होते. यासाठी सुमारे ७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, येथील जागेत बाधित झालेल्या काहींचे पुनर्वसन न झाल्याने या चौपाटीचे काम रखडले होते. परंतु, आता या चौपाटीचा तेवढा हिस्सा वगळून उर्वरित ५० टक्के काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे.

मासुंदा चौपाटीचे कामही वेगातnसध्या स्मार्टसिटीअंतर्गत मासुंदा तलाव परिसर सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी १४ कोटींचा खर्च केला जात आहे. त्यानुसार हे कामदेखील डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. तसेच येथील ग्लास पाथवेचे कामही याच बरोबर पूर्ण होणार आहे.nदुसरीकडे स्मार्ट मोबिलिटी या प्रकल्पाचे कामही येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पादचाऱ्यांना रस्त्यांवर किंवा फूटपाथवरून योग्य पद्धतीने चालता यावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हे काम हाती घेतले आहे.