शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

निर्जंतूकीकरणासाठी देणार हजार लिटर हायड्रोजन; एनपीएल कंपनीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:15 IST

वडवली येथे एनपीएल नावाची कंपनी आहे. या कंपनीत हायड्रोजन पॅराक्साईड नावाचे रसायन तयार केले जाते.

कल्याणकल्याणच्या आंबिवली वडवली परिसरात असलेल्या एनपीएल कंपनीने निर्जंतूकीकरणासाठी एक हजार लिटर हायड्रोजन पॅराक्साईड देण्याचे मान्य केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेस हे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या हायड्रोजन पॅराक्साईडच्या माध्यमातून महापालिका हद्दीतील विविध ठिकाणो निर्जंतूकीकरण करण्यात येणार आहेत. कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी देश एकवटला असता एनपीएल कंपनीने आरोग्यविषयीची त्यांची सामाजिक बांधिलकी दाखवून लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपला सहभाग दर्शविला आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक सचिन बासरे यांनी माहिती दिली की, वडवली येथे एनपीएल नावाची कंपनी आहे. या कंपनीत हायड्रोजन पॅराक्साईड नावाचे रसायन तयार केले जाते. त्याचा वैद्यकीय क्षेत्रत मोठय़ा प्रमाणात उपयोग केला जातो. या रसायानाची फवारणी केल्यास  निर्जंतूकीकरण होते. या कंपनीचे अधिकारी बासरे यांच्या परिसरात राहतात. त्यांच्याशी त्यांचे बोलणो झाले. बासरे यांनी तात्काळ महापालिका सचिव संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला. सचिवांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याश्ी संपर्क साधला. यासंदर्भात माजी महपौर राजेंद्र देवळेकर यांचेही बोलणो झाले होते. कंपनी हायड्रोजन पॅराक्साईड पुरविण्याची तयारी दर्शविल्याने शहरातील रुग्णालये, महत्वाची ठिकाणो  निर्जंतूकीकरण करण्यास मदत होणार आहे.

दरम्यान महाविकास आघाडीतील राष्टरवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भातील एक व्हीडीओ क्लीप सोशल मीडियावर पाठवली आहे. वाडिया कंपनीही हायड्रोजन पॅराक्साईड द्रव्याचे उत्पादन करणोत त्याठिकाणाचे अधिकारी हासीफ डांगी यांनीही निर्जंतूकीकरणासाठी या द्रव्याचा पुरावा करण्याचे मान्य केले आहे. तोच आदर्श वडवलीच्या एनपीएल कंपनीने दाखवित माणूकीचे दर्शन घडविले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र