शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

देशी वाणाची बियाणे वापरण्यास पुढाकार घेतला पाहिजे - बीजमाता राहीबाई पोपेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 4:38 PM

स्मार्ट उद्योजक उद्योगोपयोगी 'सीड मदर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहिबाई पोपेरे यांचे आज व्याख्यान पार पडले. 

ठळक मुद्देदेशी वाणाची बियाणे वापरण्यास पुढाकार घेतला पाहिजे - बीजमाता राहीबाई पोपेरेस्मार्ट उद्योजक उद्योगोपयोगी 'सीड मदर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहिबाईपोपेरे यांचे "पारंपरिक बियाणे व शेतकरी" या विषयावर  व्याख्यान

ठाणे : ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात "डॉ वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेत मंगळवारी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे "पारंपरिक बियाणे व शेतकरी" या विषयावर  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  देशी वाणाची बियाणे वापरण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे ते यावेळी म्हणाल्या. 

          ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात मोलाची भर घालणाऱ्या विद्या प्रसारक मंडळाचे अध्वर्यू राहिलेल्या स्वर्गीय डॉ वा ना बेडेकर यांच्या तपस्वी जीवनाला श्रद्धांजली म्हणून ही व्याख्यानमाला जोशी बेडेकर महाविद्यालयाने आयोजित केली आहे. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या कृषीप्रधान देशात अनेक प्रकारच्या धान्याच्या जाती आहेत. बियाण्यांची वाण आहेत, परंतु आज देशात हायब्रिड शेती जास्त प्रमाणात वाढलीय. शाश्वत शेती करण्यासाठी जुन्या धान्याची वाणं आज खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा पारंपारिक आणि देशी वाणाचं जतन केले पाहिजे असे राहिबाई पोपेरे यांनी सांगत मी 'देशी बियाण्यांची बँक' चालवते असा उल्लेख हि त्यांनी केला. शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या राहिबाई खरंतर ज्ञानाने समृद्ध आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख 'मदर ऑफ सीड'असा केला होता. अहमदनगर जिल्ह्यात कोंभाळणे हे एक आदिवासी खेडेगाव. राहिबाई मुळच्या याच गावच्या. राहिबाईंच्या वडिलांकडून त्यांना खूप ज्ञान मिळाले, असे त्या सांगतात. वडिल नेहमी म्हणायचे, 'जुनं ते सोनं' त्याचा अर्थ राहिबाईंनी खूप चांगला समजून घेतला. राहिबाईंच्या आजुबाजुच्या परिसरातील आजही ५० टक्के शेतकरी हा पारंपरिक पद्धतीची देशी वाणाचे बियाणे वापरूनच शेती करतो. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी प्रास्ताविकात बहिणाबाईच्या "माझी माय सरसोती" या कवितेचा संदर्भ देत राहीबाई पोपरे यांच्या कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संयोजन जनसंज्ञापन विभागाचे समन्वयक डॉ महेश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ विमुक्ता राजे यांनी केले. व्याखानास विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्याख्यान झाल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरांचा तास रंगला

टॅग्स :thaneठाणेRural Developmentग्रामीण विकासcollegeमहाविद्यालय