...तर महामार्ग जॅम करू, शिवसेनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:19 AM2018-08-31T05:19:16+5:302018-08-31T05:19:45+5:30

शिवसेनेचे तालुका कार्यकारिणी सदस्य दत्ताशेठ ठाकरे यांनी केरळ पूरग्रस्तांना २१ हजारांची आर्थिक मदत केली. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव येथे झालेल्या

... then do highway jam, Shiv Sena's hint | ...तर महामार्ग जॅम करू, शिवसेनेचा इशारा

...तर महामार्ग जॅम करू, शिवसेनेचा इशारा

Next

वासिंद : रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांना महामार्ग ठेकेदार कंपनीने काही भरपाई देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मदत न मिळाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करून मुंबई-नाशिक महामार्ग जॅम करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेनेचे तालुका कार्यकारिणी सदस्य दत्ताशेठ ठाकरे यांनी केरळ पूरग्रस्तांना २१ हजारांची आर्थिक मदत केली. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव येथे झालेल्या अपघातातील दाम्पत्याच्या उपचाराची, खर्चाची आणि घरचे किराणा सामान देण्याची जबाबदारी शिवसेनाठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जि.प. अध्यक्षा मंजूषा जाधव आणि तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी घेतली.
केरळमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे जीवित तसेच वित्तहानी झाली. या पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून दत्ताशेठ ठाकरे यांनी २१ हजारांची मदत दिली. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या कामिनी आणि सचिन या भावंडांच्या आईवडिलांचा अपघात झाला. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जि.प. अध्यक्षा मंजूषा जाधव आणि तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी रुग्णालयात भेट देऊन उपचाराची, खर्चाची तसेच किराणा सामान भरून देण्याची मदत म्हणून जबाबदारी स्वीकारल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: ... then do highway jam, Shiv Sena's hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.