शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील महिला पोलीस आत्महत्या प्रकरण : सहायक पोलीस आयुक्त निपुंगे निलंबित

By जितेंद्र कालेकर | Updated: January 29, 2018 23:45 IST

एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले ठाणे पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना अखेर राज्य शासनाने सेवेतून निलंबित केले आहे.

ठळक मुद्देकळवा पोलीस ठाण्यात झाला आहे गुन्हा दाखलआॅक्टोंबर २०१७ मध्ये आयुक्तालयाने पाठविला निलंबनाचा प्रस्तावचौकशीअंती राज्य शासनाने दिले निलंबनाचे आदेश

जितेंद्र कालेकरठाणे : महिला पोलीस कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अद्यापही गैरहजर आहेत. हे प्रकरण अन्वेषणाधीन असल्यामुळे त्यांना राज्य शासनाने १० जानेवारीच्या आदेशानुसार खात्यातून अखेर निलंबित केले आहे.ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या निपुंगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. बावनकर यांनी फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने मात्र तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांना हा जामीन मंजूरही केला. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला होता.त्यांच्यावरील आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारख्या गंभीर आरोपानंतर ते थेट सीक रजेवर गायब झाले होते. प्रशासकीय शिस्त मोडल्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्तावच ठाणे पोलीस आयुक्तालयाने आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्य शासनाकडे पाठवला होता. आपला या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून तपास पथकाला सर्व प्रकारे सहकार्य करण्याची पूर्ण तयारी दर्शवणा-या निपुंगे यांनी ६ सप्टेंबरनंतर तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ किंवा पोलीस आयुक्तालयातील कोणत्याही वरिष्ठ अधिका-याकडे शरणागती पत्करली नाही. या प्रकरणातील अन्य एक सहआरोपी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल तथा सुभद्राचा भावी पती अमोल फापाळे याला चौकशीअंती २७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. निपुंगे हे मात्र वैद्यकीय कारण देऊन दीर्घ रजेवर गेले. सुरुवातीला मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी त्यांना आजाराचे नेमके स्पष्टीकरण देण्यासाठी एक आठवड्याच्या आत हजर राहण्याचे किंवा तशी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले होते. तिलाही न जुमानता ते संपर्क कक्षाच्या बाहेरच राहिले. त्यांच्यावरील आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपांचा तपास अधिकारी रमेश धुमाळ यांचा अहवाल तसेच मुख्यालयाच्या उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या कार्यालयाचा बेकायदेशीरपणे सीक रजेवर गेल्याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. त्याची दखल घेऊन त्यांना पोलीस खात्यातून निलंबित केल्याचा आदेश राज्य शासनाने १० जानेवारी रोजी काढला आहे. तो ठाणे पोलिसांनी निपुंगे यांच्या पुणे येथील घरी बजावला आहे...................‘‘निपुंगे यांच्याविरुद्ध महिला पोलीस कॉन्स्टेबलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. याच कारणास्तव त्यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. तसा आदेश निपुंगे यांच्या पुण्यातील घरीही बजावण्यात आला आहे.’’मकरंद रानडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहर

------------काय आहे प्रकरण...६ सप्टेंबर २०१७ रोजी कळव्यात राहत्या घरी महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिने आत्महत्या केली होती. त्या वेळी सुभद्राला एसीपी निपुंगे यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार तिने तिचा भावी पती अमोल फापाळे यांच्याकडे केली होती. त्यामुळेच आपण त्यांना भेटू आणि त्यांच्याशी सविस्तर बोलू, असेही अमोलने तिला सुचवले होते. तसा फोनही निपुंगे यांना केला होता. त्यावेळी ‘तुम्ही येऊ नका मीच येतो’, असे निपुंगेंनी त्यांना सुचवले होते. हीच माहिती अमोलने सुभद्राचा नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल भाऊ सुजित पवार याला दिली. सुजित नवी मुंबईतून ठाण्याकडे येण्यासाठी निघाला, तोपर्यंत सुभद्राने आत्महत्या केली होती. घटनास्थळी निपुंगे तिथे असूनही त्यांनी तिथून पलायन केले होते. त्यानंतर, ते नॉट रिचेबल झाले. निपुंगे यांनी सुभद्राचा मानसिक छळ केल्याचा तसेच ‘तुझ्या ड्युटीची सेटिंग करून देतो, तू मला भेटायला ये’ असे तिने म्हटल्याचेही अमोलने पोलिसांना सांगितले. परंतु, घटनास्थळी अमोलशी तिची चर्चा झाल्यानंतरच तिने आत्महत्या केल्याने याच प्रकरणात त्यालाही पोलिसांनी चौकशीअंती अटक केली..................................दरम्यान, एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटकेची कारवाई झाली की, संबंधित सरकारी अधिकाºयाला निलंबित केले जाते. या प्रकरणात निपुंगेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला होता. परंतु, पवार हिच्या नातेवाइकांनी हे प्रकरण लावून धरले होते. शिवाय, त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली होती. याच मागणीमुळे त्यांच्यावर हे निलंबन झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा