Thane ready for Dahihandi; The big Dahi Handi festival organised in Thane | दहीहंडीसाठी ठाणे झालं सज्ज; 'या' ठिकाणी असणार शहरात मोठ्या हंडी 
दहीहंडीसाठी ठाणे झालं सज्ज; 'या' ठिकाणी असणार शहरात मोठ्या हंडी 

ठाणे - दहीहंडी उत्सवासाठी संपूर्ण शहर सज्ज झालं आहे. ठाण्यातील दहीहंडी ही गोविंदासाठी पंढरी मानले जाते. संकल्प प्रतिष्ठान, संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसे, टेंभीनाका दहीहंडी अशा अनेक लाखमोलाच्या दहीहंड्या ठाण्यात लागतात. याच शहरात दहीहंडीमध्ये 9 थरांचा जागतिक विक्रम लावण्याचा मान जोगेश्वरीच्या जय जवान गोविंद पथक आणि बोरिवलीचं शिवसाई गोविंदा पथक यांच्याकडे आहे. 

मात्र यंदाच्या दहीहंडी उत्सावाला किनार आहे ती महाराष्ट्रात आलेल्या पुराची. कोल्हापूर, सातारा, सांगली याठिकाणी आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणच्या दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनीही यंदा दहीहंडी रद्द केली आहे. पण ठाणे शहरातील दहीहंडी आयोजकांनी पूरपरिस्थितीचं भान ठेऊन उत्सव साजरा करतानाच दहीहंडी सणही साजरा करण्याचं ठरवलं आहे. 

बक्षिसातील रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा मानस आयोजकांनी आखला आहे. अनेक ठिकाणी लागणाऱ्या प्रसिद्ध दहीहंडी आयोजकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्टॉल, बक्षिसातील अर्धी रक्कम तर मंडळांनी पूरग्रस्तांना मदत करावी यासाठी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्याचा उत्साह गोविंदांमध्ये असणार त्याचसोबत पूरग्रस्तांना मदत करण्याचं सामाजिक भानही गोविंदा जपणार आहेत. 

या आहेत ठाण्यातील मोठ्या दहीहंडी 
 

1)शिवसेना - आमदार ,प्रताप सरनाईक ( संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट- प्रो गोविंदा)
ठिकाण: वर्तक नगर ,ठाणे पश्चिम
सकाळी 11 ते रात्री 10 वाजे पर्यंत
6 ते 10 प्रो गोविंदा असणार..
पाहिले पारितोषिक - 5 लाख 
दुसरे पारितोषिक - 3 लाख
तिसरे पारितोषिक- 2 लाख
चौथे- 1 लाख
मुंबईतून 7 आणि ठाण्यातून 3 दही हंडी मंडळ सहभागी
विशेष परितोषिक इतर मंडळाना.
पूरग्रस्तांसाठी स्टॉल लावून मदत निधी जमा करण्याचं आवाहन करणार 
आयोजक: प्रताप सरनाईक आणि सचिव  पूर्वेस सरनाईक संपर्क: 9833505000

2)शिवसेना- आमदार,रवींद्र फाटक ( संकल्प दहीकाला उत्सव)- 
ठिकाण: चौक ,रघुनाथ नगर,वागले इस्टेट ठाणे पश्चिम
वेळ : सकाळी 10 वाजता
पूरस्थिती बघता यावर्षी मोठ्या थाटामाटात दहीकाला न करता पारंपारिक व सांस्कृतिक वातावरणात दहीहंडी सण साजरा करणार .या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात देणार
रवींद्र फाटक सेना आमदार संपर्क:9819089999

3)शिवसेना, खासदार राजन विचारे
ठिकाण: आनंद दिघे चॅरिटेबल ट्रस्ट
जांभळी नाका ,ठाणे पश्चिम
वेळ: सकाळी 12: 30 वाजता
सांगली कोल्हापूर याठिकाणी पूर आल्यामुळे यंदाचे दहीहंडी रद्द .
उत्सव म्हणून कॅन्सर पीडितांसाठी दोन थरांची हंडी ठेवण्यात आली आहे आणि पूरग्रस्तांसाठी  मदतीचे आवाहन करणार आहे. जी रक्कम जमेल ती पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.
संपर्क: राजन विचारे- 9821191111

4) शिवसेनेची मानाची हंडी (आनंद दिघे यांची मानाची हंडी)
ठिकाण - टेंभी नाका,ठाणे पश्चिम
यंदाची दही हंडी साध्या पद्धतीने करणार आहे.. तसेच पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून मदतीचे आवाहन करणार आहे.
संपर्क:नरेश म्हस्के-9819389080

5) मनसे हंडी महोत्सव 
ठिकाण: भगवती मैदान, मनसे कार्यालयाच्या बाजूला, विष्णू नगर,ठाणे पश्चिम
आयोजक मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव
नऊ थरासाठी 11 लाख पहिले पारितोषिक
पूरस्थिती पाहता साडेपाच लाख पूरग्रस्तांसाठी आणि साडेपाच लाख मंडळांना देणार
पूरग्रस्त लोकांना मदतीचे धनादेश वाटप करणार
वेळ: सकाळी 9: 30 वाजता सुरू होणार.
संपर्क: अविनाश जाधव - 9867027629

6) स्वामी प्रतिष्ठान
आयोजक -शिवाजी पाटील( भाजप माथाडी कामगार सेल- अध्यक्ष)
ठिकाण: हिरानंदानी मेडोज चौक,डॉ .काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर,ठाणे पश्चिम
वेळ: सकाळी 10 वाजता सुरू
यंदाचा दुसरं वर्ष पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दहीहंडी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख 55 हजार रुपये मदत.
चंदगड तालुक्यातील 25 पूरग्रस्त परिवारांचे घरे नव्याने बांधून देण्याचाही मानस 
संपर्क: शिवाजी पाटील- 9321115111


Web Title: Thane ready for Dahihandi; The big Dahi Handi festival organised in Thane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.