Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:32 IST2025-10-04T13:31:29+5:302025-10-04T13:32:46+5:30
All India Police Bodybuilding Championship: अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ठाण्याच्या पीएसआय स्नेहा सुनील करणाळे यांनी सुवर्णपदक जिंकले आहे.

Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
विशाल हळदे / लोकमत, ठाणे
हरियाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या ७४व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ठाणे शहरातील महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सुनील करणाळे यांनी ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. दिनांक २० ते २४ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या भव्य स्पर्धेत देशभरातून तब्बल २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये २७ महिला खेळाडूंचाही समावेश होता.
ठाणे जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी चार खेळाडूंनी आपले प्रतिनिधित्व केले होते. त्यात तिघे पुरुष तर एकमेव महिला खेळाडू म्हणून स्नेहा करणाळे यांनी सहभागी होऊन सुवर्णपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर स्नेहा करणाळे यांची निवड आगामी वर्ल्ड पोलिस गेम्ससाठी झाली आहे. मार्च २०२७ मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणाऱ्या या स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ठाणे पोलिस दलातील महिला अधिकारी स्नेहा करणाळे यांच्या या यशामुळे ठाणेकरांचा अभिमान दुणावला आहे.