शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

ठाणे महापालिकेने केली शहरातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 5:49 PM

राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने नव्याने शांतता क्षेत्र घोषीत केले आहेत. त्यानुसार शहरातील २६ ठिकाणे हे शांतता क्षेत्र म्हणून यापुढे ओळखले जाणार आहेत. यामध्ये बहुसंख्य शाळांच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशहरातील शांतता क्षेत्रात झाली वाढशाळांच्या ठिकाणांच्या परिसराचा अधिक समावेश

ठाणे -ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील २६ ठिकाणे आता शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांनी ध्वनी पातळीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी सुमारे १३ ठिकाणे ही शांतता क्षेत्र म्हणून ओळखली जात होती. परंतु आता त्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परंतु नव्याने जी काही ठिकाणी घोषीत करण्यात आली आहेत, किंवा यापूर्वी जी ठिकाणी शांतता क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आली होती, त्याठिकाणी ध्वनी प्रदुषणाची पातळी अनेक वेळेला वाढलेली आढळून आली आहे. त्यामुळे आता वाढलेल्या क्षेत्रांमध्ये नियमांची अंमलबजावणी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.                                ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० च्या अनुषंगाने मुख्य नियमांच्या नियम ३(२)अन्वये विविध क्षत्रांकारिता ध्वनी मानकांच्या प्रयोजनासाठी औद्योगिक, व्यावसायिक, निवासी व शांतता क्षेत्र असे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. त्यानुसार राज्य शासनाने पालिका क्षेत्रातील शांतता क्षेत्र अधिसूचित करण्याचे निर्देश दिले होते. राज्य शासनाच्या वर्गीकरणानूसार महापालिका क्षेत्रातील एकूण २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणाच्या १०० मीटर अंतरापर्यंत शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांनी या सर्व ठिकाणी ध्वनी पातळीचे पालन करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. यामध्ये कामगार रु ग्णालय वागळे इस्टेट(शांतता), बेथनी हॉस्पिटल पोखरण रोड नं.२(औद्योगिक), वेदांत हॉस्पिटल ओवळा (रहिवासी), सफायर हॉस्पिटल कावेरी हाईट, खारेगाव (रहिवासी),ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल्स लि. पूर्व द्रुतगती महामार्ग (औद्योगिक), ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालय, कळवा (शांतता), जिल्हा सामान्य रु ग्णालय, उथळसर (शांतता), सेट जॉन बाप्टिस्ट हायस्कुल, जांभळी नाका(शांतता), माजिवडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मराठी/हिंदी/इंग्लिशहायस्कुल, माजिवडा(रहिवासी), ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय, परबवाडी (शांतता), एम.एच.मराठी हायस्कुल शिवाजी पथ, नौपाडा(शांतता), ज्ञानोदय माध्यमिक हिंदी विद्यालय सावरकर नगर (औद्योगिक), अल-नदी-उल-फलाह इंग्लिश स्कूल कौसा,मुंब्रा (रहिवासी), अब्दुल्ला पटेल हायस्कुल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, नागसेन नगर (रहिवासी), न्यू हॉरिझोन स्कॉलर्स स्कूल,कावेसर (शांतता), भारतरत्न इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय,सावरकर नगर (शांतता), सेंट झेवियर्स इंग्लिश माध्यमिक विद्यालय, पातलीपाडा (रहिवासी), हिरानंदानी फाऊंडेशन स्कुल हिरानंदानी इस्टेट (रहिवासी), लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, वर्तकनगर (शांतता), वसंत विहार इंग्लिश हायस्कुल, वसंत विहार(शांतता), सिंघानिया स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज पोखरण रोड नं.१(शांतता),डी.ए.व्ही. पब्लीक स्कूल तत्वद्यान विद्यापीठासमोर (शांतता), जन विकास संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल,कळवा (शांतता), विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर महाविद्यालय (शांतता), ठाणे महानगरपालिका शाळा क्र . ३१/४० शिमला पार्क(शांतता) आणि ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट नाका (शांतता) या ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त