Thane Water Cut: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, ‘या’ दिवशी १२ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:41 IST2025-05-19T18:36:46+5:302025-05-19T18:41:35+5:30
Thane Water Supply: देखभालीच्या कामामुळे ठाणे महानगरपालिकेने २१ मे रोजी १२ तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा केली.

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, ‘या’ दिवशी १२ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद!
ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात येत्या २१ मे रोजी १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देखभालीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ठाणे महानगरपालिकेने रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
ठाण्यात पिसे उडांचल केंद्रातील जलशुद्धीकरण केंद्र आणि उच्च दाब उपकेंद्राच्या दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेने २१ मे रोजी घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याच्या काही भागात १२ तासांचा पाणीपुरवठा बंद करण्याची घोषणा केली.
टीएमसी अधिकाऱ्यांच्या मते, मान्सूनपूर्व देखभाल, नियंत्रण पॅनेल दुरुस्ती, उच्च-दाब सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन आणि टेमघरमधील जलशुद्धीकरण केंद्राच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस पाणीपुरवठ्याचा दाब कमी राहील, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.