ठाणे महापालिकेने ५० बेघर व्यक्तींचेही केले लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 13:08 IST2021-10-03T12:59:28+5:302021-10-03T13:08:49+5:30
लस महोत्सवाबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी कटिबद्ध असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी शहरातील एकूण ५० बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.

समाजातील शेवटच्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी कटिबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लस महोत्सवाबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी कटिबद्ध असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी शहरातील एकूण ५० बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. शहरातील प्रत्येक नागरिकांच्या लसीकरणासाठी ठाणे महानगरपालिका कटिबद्ध असल्याची ग्वाही महापौर नरेश म्हस्केआणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
महापालिकेच्यावतीने समाजातील विविध स्तरांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. यापूर्वी महिला आणि पुरुष रिक्षाचालक, तृतीयपंथीय, ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्र राबविण्यात आले. त्याचबरोबर घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या नागरिकांसाठीही थेट घरी जाऊन लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आता शहरातील बेघर व्यक्तींचेही लसीकरण करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विशेष पथकाद्वारे शहरात विविध ठिकाणी आरोग्य पथकांनी जाऊन निवाºयाअभावी बेघर असलेल्यांचा शोध घेतला. त्यांना त्या- त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.