शंकर पाटाेळेंसह तिघांचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:21 IST2025-10-11T09:20:43+5:302025-10-11T09:21:13+5:30
गुरुवारी याच संदर्भात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या अधिकाऱ्यांची चांगली हजेरी घेतली हाेती.

शंकर पाटाेळेंसह तिघांचा जामीन फेटाळला
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बांधकाम व्यावसायिकाकडून ३५ लाखांची लाच स्वीकारणारे ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटाेळे यांच्यासह तिघांचेही जामीन अर्ज ठाण्याचे सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी फेटाळले. या गंभीर प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असल्याने आरोपींकडून पुराव्यांमध्ये काेणतीही छेडछाड हाेऊ नये, यासाठी जामीन फेटाळल्याचे न्यायालयाने म्हटले.
गुरुवारी याच संदर्भात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या अधिकाऱ्यांची चांगली हजेरी घेतली हाेती. तपासातील काही त्रुटींवरही बाेट ठेवले. निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास दिल्याबद्दल न्यायालयाने खेद व्यक्त केला. त्यामुळे निरीक्षकांऐवजी अधीक्षकांनीच या सुनावणीला हजर हाेण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी एसीबीचे ठाण्याचे अधीक्षक शिवराज पाटील हे स्वत: उपस्थित हाेते.
...तर तपासात बाधा
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने अशा प्रकारे लाच घेणे हे समाजाला घातक आहे. आराेपीला जामीन
दिल्याने तपासात बाधा येऊ शकते. तपास प्राथमिक पातळीवर असल्याचे सरकारी वकील संजय लाेंढे यांनी मांडली.
दाेन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर पाटाेळे यांच्यासह तिन्ही आराेपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले. सुनावणीच्या वेळी न्यायालयात अनेक वकिलांनीही गर्दी केली हाेती.