शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

राज्यात पहिल्यांदाच महाशिवआघाडीचं दर्शन घडणार; महापौर निवडणूक बिनविरोध होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:57 IST

शिवसेनेच्या महापौरांना मातोश्रीकडून कमिटमेंट; पण महाशिवआघाडीमुळे अनेक नावं चर्चेत

ठाणे  -  एकीकडे ठाण्याचा महापौर कोण होणार यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. परंतु दुसरीकडे महापौर कोणी झाला तरी त्याची निवड ही बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महापौर निवडणुकीत पहिल्यांदा महाशिवआघाडीचे दर्शन घडणार आहे. यामुळेच ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. शिवसेनेच्या श्रेष्ठींकडून नरेश म्हस्के यांना शब्द देण्यात आला असला तरी महाशिवआघाडीच्या निमित्ताने अनेक नावे चर्चेत आली आहेत.राज्यातील बहुतेक महापालिकांच्या महापौरांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. यामध्ये ठाण्याची खुला प्रवर्गासाठी सोडत निघाल्याने आता पुढील सव्वा दोन वर्षे या खुर्चीवर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार पक्षाची पसंती ही सभागृह नेते नरेश म्हस्के यांना असली तरी, आता महापौर खुला प्रवर्गासाठी सोडत असल्याने अनेकांनी यासाठी दावा ठोकण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये देवराम भोईर यांचे नाव पुढे असून सध्याच्या विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कळव्यातील अनिता गौरी यांच्या नावाचीही चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र नरेश म्हस्के यांना पक्षाने महापौराबद्दल शब्द दिल्याचा दावा करण्यात आला असल्याने खासदार आणि आमदारांच्या पत्नींनी यातून माघार घेतल्याचे बालले जात आहे.यापूर्वी महापौर निवडणुकीत अनेक वेळा चुरस झाल्याचे पहावयास मिळाले होते. 2012 च्या महापौर पदाच्या निवडणुकीत सत्तेच्या जवळ येऊनही शिवसेनेला महापौरपदासाठी ठाणे बंदची हाक द्यावी लागली होती. त्यावेळेस मित्र पक्ष असलेला भाजपचा एक नगरसेवक गायब झाला होता. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु ऐनवेळेस मनसेने टाळी दिल्याने शिवसेनेला महापौरपद मिळाले होते. त्यानंतरही अडीच वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेसही सत्ताधाऱ्यांना कसरत करावी लागली होती. परंतु ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आता वेगळे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वाढली असल्याने त्याचे दर्शन आता ठाणे महापालिकेतही झाले आहे. नुकत्याच झालेल्या महासभेतसुद्धा या महाशिवआघाडीचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता महापौर निवडणुकीतही हाच पॅटर्न दिसून येणार आहे.काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून महापौरपदाची निवडणूक लढविली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. महाशिवआघाडी असल्याने या निवडणुकीतून राष्ट्रवादीने जवळ जवळ माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता अनेकांनी महापौरपदावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेBJPभाजपा