LPG Gas Fraud: ‘गॅस कनेक्शन बंद होणार’ सांगत व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:12 IST2026-03-17T11:10:44+5:302026-03-17T11:12:50+5:30

LPG Gas Online Scam: गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगत ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडून सायबर गुन्हेगाराने कापड व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Thane LPG Gas Fraud Cylinder Crisis Trader cheated of Rs 14 lakhs by saying 'gas connection will be closed' | LPG Gas Fraud: ‘गॅस कनेक्शन बंद होणार’ सांगत व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

LPG Gas Fraud: ‘गॅस कनेक्शन बंद होणार’ सांगत व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

डोंबिवली : गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगत ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडून सायबर गुन्हेगाराने कापड व्यापाऱ्याची १४ लाख ४६ हजार ९८९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अरुण मोरे, असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

टिळकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या महिन्यात संध्याकाळच्या सुमारास दिनेश जोशी नावाच्या व्यक्तीने मोरे यांना फोन केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण एका गॅस कंपनीतून बोलत असून, परिसरात नवीन गॅस वाहिनी टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, सध्याचे गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची माहिती देत काही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन व्यवहार करण्यास सांगितले.

दोन दिवसांनी पुन्हा रात्रीच्या सुमारास त्या व्यक्तीने संपर्क साधून १२ रुपये ऑनलाइन पाठविण्याची मागणी केली. मात्र, संशय आल्याने मोरे यांनी त्याला पुन्हा संपर्क करू नये, अन्यथा पोलिसांत तक्रार करू, अशी तंबी देत मोबाइल बंद केला. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास मोरे यांच्या मोबाइलवर खात्यातून पैसे काढल्याचे संदेश येऊ लागले. वेगवेगळ्या आठ बँक व्यवहारांद्वारे १४ लाख ४६ हजार ९८९ रुपये त्यांच्या खात्यातून काढले. आपण कोणतेही व्यवहार केले नसतानाही खात्यातून मोठी रक्कम वळती झाल्याने मोरे यांना धक्का बसला. गेल्या दोन दिवसांपासून संपर्क साधणाऱ्या जोशी या व्यक्तीवर संशय व्यक्त करत मोरे यांनी त्याच्याविरोधात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची तक्रार टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल केली.

दरम्यान, गेल्या आठवड्यातही पूर्वेकडील सुनीलनगर परिसरातील स्मिता राणे या महिलेची अशाच प्रकारे २ लाख ९९ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली होती.

Web Title : गैस कनेक्शन घोटाला: व्यापारी को साइबर धोखाधड़ी से ₹14 लाख का नुकसान

Web Summary : डोम्बिवली के एक व्यापारी को ₹14.46 लाख का नुकसान हुआ, जब एक साइबर अपराधी ने गैस कंपनी का प्रतिनिधि बनकर अनिवार्य गैस कनेक्शन अपडेट के बहाने उसे ऑनलाइन भुगतान करने के लिए मजबूर किया। पुलिस धोखाधड़ी की जांच कर रही है।

Web Title : Gas Connection Scam: Merchant Loses ₹14 Lakhs to Cyber Fraud

Web Summary : A Dombivli merchant lost ₹14.46 lakhs after a cybercriminal, posing as a gas company representative, tricked him into making online payments under the guise of a mandatory gas connection update. Police are investigating the fraud.