ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:29 IST2025-06-11T12:24:57+5:302025-06-11T12:29:27+5:30
Airoli Chinese food stall Vehicle Fire: ठाण्यातील ऐरोली स्थानकाबाहेर गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे चायनीज विकणाऱ्या वाहनाला आग लागली.

ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
ठाण्यातील ऐरोली स्थानकाबाहेर गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे चायनीज विकणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली. ही आग मंगळवारी (१० जून २०२५) रात्रीच्या सुमारास लागली. सुदैवाने, या आगीत कोणताही जिवीतहानी झाली नाही. परंतु, या आगीत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ठाणे- बेलापूर महामार्गावर ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चायनीज फूड स्टॉल वाहनाच्या आत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे भीषण आग लागली आणि वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने, या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती आयएएनएसने वृत्तसंस्थेने दिली.
Thane, Maharashtra: A blast occurred in a gas cylinder inside a roadside Chinese food stall vehicle parked near Airoli railway station on the Thane-Belapur highway. The explosion triggered a fierce fire that completely gutted the vehicle. No casualties were reported pic.twitter.com/rAsmuCxWJE
— IANS (@ians_india) June 10, 2025
"ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास हा स्फोट झाला. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले", अशी माहिती नवी मुंबई अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
घटनास्थळी लोकांनी गर्दी केल्याने ठाणे- बेलापूर महामार्गावरील वाहतूक तात्पुरती ठप्प झाली. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज आला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, गॅस सिलिंडरची तुकडे परिसरात पसरले. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.