शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची चाचणी न करता घरी सोडण्याचे प्रकार, महापौरांनी केला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 4:48 PM

ठाण्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ही जमेची बाजू असली तरी कोरोना बाधीत रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यावर त्याला घरी सोडतांना त्याची पुन्हा चाचणी केली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे.

ठाणे : ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही बाब जरी ठाण्यासाठी समाधानकारक असली तरी देखील यातून आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. कोरोना बाधीत रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर सातव्या किंवा आठव्या दिवशी अशा रुग्णांना बरे वाटल्यानंतर तत्काळ घरी सोडले जात असल्याचा धक्कादायक आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. वास्तविक पाहता घरी सोडण्यापूर्वी रुग्णाची कोरोना चाचणी होणे गरजेचे असतांना तसे केले जात नसल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे पत्र त्यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना दिले आहे.           ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही १५४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ११६ रुग्ण हे बरे झाले असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु या मागचे वास्तव आता समोर येत आहे. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना सात ते आठ दिवसात बरे वाटू लागले. ताप येत नसल्यास त्यांची पुन्हा कोरोना चाचणी न करता त्यांना घरी सोडले जात असल्याची धक्कादायक समोर आली आहे. वास्तविक पाहता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात स्पष्ट सांगितले हो की इतर राज्याप्रमाणे किंवा केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार नाही तर जो पर्यंत कोरोना बाधीत रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही, आणि त्याची पुन्हा कोरोना चाचणी निगेटीव्ह येत नाही, तो पर्यंत घरी सोडू नये असे सांगितले आहे. परंतु त्याकडेही येथील खाजगी रुग्णालयांनी दुर्लक्ष केल्याचे म्हस्के यांनी म्हंटले आहे. शहरात आजच्या घडीला झोपडपटटी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात अशा प्रकारे चाचणी न करता एखाद्याला घरी सोडले जात असेल आणि तो पूर्णपणे बरा झाला नसेल तर त्याच्या संपर्कातील इतरांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे ही देखील चिंतेची बाब असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. त्यातही या रुग्णालयांकडे विचारणा केली असता आमच्याकडे तशा कोणत्याही स्वरुपाचे आदेश किंवा पत्र आलेले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वेळीच या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या