After a two-and-a-half month wait, the city's economy is set to begin | अडीच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शहरातील अर्थव्यवस्था होणार सुरु

अडीच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शहरातील अर्थव्यवस्था होणार सुरु

ठाणे : कोरोनामुळे लॉकडाऊन झाला होता. या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्वच अर्थव्यवस्था मागील अडीच महिने ठप्प होती. अखेर आता ही अर्थव्यवस्था शुक्रवार पासून सुरु होणार आहे. शुक्र वारपासून सम-विषम पद्धतीने शहरातील बाजारपेठा, इतर दुकाने सुरु होणार आहेत. यामुळे शहराची ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रु ळावर येण्याची चिन्हे असून त्याचबरोबर ठाणेकरांना जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त आता आवश्यक असलेल्या इतर वस्तु मिळण्याचा या निमित्ताने मोकळा झाला आहे. परंतु या दुकानांमध्ये गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
            ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यापासून शहरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तु, दुध, औषधालये आणि भाजीपाला दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तुंची दुकाने बंद आहेत. त्यात कपडे, हार्डवेअर, स्टेशनरी तसेच अन्य साहित्यांचा दुकानांचा समावेश होता. या बंदीमुळे शहराची अर्थव्यवस्था ठप्प झाल्याचे चित्र आहे. मात्र, ही अर्थव्यवस्था आता पुन्हा रु ळावर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले असून त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाचा आधार घेऊन शहरातील बाजारपेठा आणि इतर साहित्यांची दुकाने सुुरु करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयानंतर प्रभाग समतिीस्तरांवर सम-विषम पद्धतीने दुकाने कशी सुरु करायची याचे नियोजन प्रशासनाने सुरु केले होते. तसेच या नियोजनासाठी स्थानिक व्यापाऱ्यांसोबतही प्रशासनाने बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार रस्त्यांवरील दुकानांच्या हद्दीही निश्चित करण्यात आल्या आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील राम मारु ती रोड, गोखले रोड, तलावपाळी, ठाणे मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या आस्थापना आहेत. तर जांभळीनाका मोठी भाजीमंडई, खारकर आळीत मोठी धान्य बाजारपेठ आहे. हे सर्वच शुक्र वारपासून सुरु होणार आहे. तर शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागात जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरु केली जाणार आहेत, मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स वगळता सर्व बाजारपेठ आणि दुकाने सम-विषम पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार रस्त्यांच्या एका बाजुची दुकाने सम तारखांना उघडण्यात येणार आहेत तर रस्त्याच्या दुसया बाजुची दुकाने विषम तारखांना उघडण्यात येणार आहेत. ही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुली राहणार आहेत. परंतु या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच दुकानदारांनी देखील याची काळजी घ्यावी असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
 

Web Title: After a two-and-a-half month wait, the city's economy is set to begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.