शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : बिले मिळविण्यासाठी ठेकेदारांचे भर पावसात पालिकेसमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 19:53 IST

बिले न काढल्यास सुरू असलेली कामं बंद करण्याचा इशारा. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती झालीये बिकट.

ठळक मुद्देबिले न काढल्यास सुरू असलेली कामं बंद करण्याचा इशारा. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती झालीये बिकट.

ठाणे  : कोरोनामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असली तरी मागील २०१९ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान, पाणी पुरवठा, ड्रेनेज आदींसह इतर विभागांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिलेच अदा केली नसल्याने संतप्त झालेल्या या ठेकेदारांनी गुरुवारी सांयकाळी पाच वाजता भर पावसात महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. येत्या दोन दिवसात पाणी विभागाने बिल काढले नाही, तर सोमवार पासून सुरु असलेली सर्वच कामे बंद करु असा इशारा यावेळी या ठेकेदारांनी दिला आहे. तसेच लवकरात बिले काढण्यात यावीत, अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मालमत्ता कर आणि पाणी पुरवठा करावरच पालिकेची सध्या मदार आहे. परंतु २०१९ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान, पाणी पुरवठा, ड्रेनेज आदींसह इतर विभागातील कामे पूर्ण करुन देणाऱ्या ठेकेदारांची अद्यापही बिले निघाली नसल्याची बाब समोर आली आहे. कोरोना काळातही आमच्याकडून पालिकेने अत्यावश्यक स्वरुपाची कामे करुन घेतली आहेत. कामे पूर्ण करुन देण्यासाठी लोकप्रतिनिधी देखील आमच्या मागे लागले होते. परंतु आता कामे पूर्ण झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी देखील आमच्याकडे पाठ फिरविली असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. 

बिले निघत नसल्याने कच्चा माल ज्यांच्याकडून घेतला आहे, त्यांचे फोन येऊन त्यांचा त्रस सहन करावा लागत आहे. महापालिकेची कामे पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून कामे केलेली आहेत. परंतु आता कर्जाचे हप्ते थकले आहेत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. कामे करुन घेण्यासाठी जे काही कर्मचारी कामाला होते, त्यांना देखील देण्यासाठी पैसे नसल्याचा मुद्दा यावेळी या ठेकेदारांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वीही आंदोलन दरम्यान मधल्या काळात आंदोलन केल्यानंतर २५ लाखांची बिले काढण्यात आली होती. परंतु त्यानंतर बिले काढलीच जात नसल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. तर आतार्पयत ७०० ते ८०० कोटींची बिले पालिकेने अदा केली नसल्याचा दावा देखील या आंदोलनकर्त्या ठेकेदारांनी केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात पालिकेने यावर ठोस निर्णय घेऊन बिले अदा करावी अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशाराही देखील देण्यात आला आहे. तसेच महापालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषणही करण्याचा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाRainपाऊस