शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी ‘सरां’नी घेतला दहावीच्या वर्गावर तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 16:29 IST

सुदृढ राहा आणि पालकांच्या मनातील भिती घालवा, विद्यार्थ्यांना केले आवाहन.

ठळक मुद्देसुदृढ राहा आणि पालकांच्या मनातील भिती घालवा, विद्यार्थ्यांना केले आवाहन

ठाणे: नौपाड्यातील गोखले रस्त्यावरची सरस्वती मंदीर ट्रस्टच्या शाळेची घंटा तब्ब्ल पावणे दोन वर्षांनी वाजली…दुसऱ्या मजल्यावरच्या दहावी ब च्या वर्गात शिक्षक आले..विद्यार्थ्यांनी त्यांना एका स्वरात नमस्ते केले…शिक्षकांनी त्यांची ओळख करून दिली नमस्कार मी राजेश नार्वेकर…आज तुम्हाला स्त्री शिक्षणाचे प्रणेते धोंडो केशव कर्वे यांच्यावरील कर्ते सुधारक कर्वे हा धडा शिकविणार आहे…आणि पुढील किमान पाऊण तास जिल्हाधिकारी नार्वेकर ‘सरां’नी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन त्यांच्याशी गप्पा मारीत वर्गावरचा तास पूर्ण केला. कोरोना कालखंडात बंद असलेल्या शिक्षण पर्वाचा शुभारंभ आज अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अनोखे उदाहरण समोर ठेवले.

शाळेत आज वेगळीच लगबग सुरू होती. प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. शाळेची घंटा फुलांनी सजविली होती. कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील शाळा पूर्ववत सुरू व्हायला पावणे दोन वर्ष लागले. त्यामुळे आज हा नव्या शैक्षणिक पर्वाचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी मुलांना शिकविण्याचा मानस केला होता.

त्यानुसार सरस्वती मंदीर ट्रस्टच्या नव्या इमारतीत आज प्रथमच वर्ग भरले होते. जिल्हाधिकारी नार्वेकर शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील दहावी ब च्या वर्गात तास घ्यायला आले. वर्गशिक्षिकेनी नविन सरांची ओळख विद्यार्थीनींना करून दिली. त्यानंतर पुढचा पाऊण तास नार्वेकर या वर्गावर होते. त्यांनी दहावीच्या मराठी पुस्तकातला कर्ते सुधारक कर्वे हा धडा शिकविला. महिलांना शिक्षित केलं तरच भारतीय स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने महत्व मिळेल या उद्देशाने धोंडो केशव कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी केलेल्या कार्याची शिकवण त्यांनी या धड्याच्या माध्यमातून दिली. पुस्तकी ज्ञानासोबतच सभोवतालचे ज्ञान वाढवावे. स्वताला विकसीत करण्यासाठी चौफेर ज्ञान मिळावावे. विश्लेषणात्मक अभ्यास करावा. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला प्राधान्य द्यावे, असे नार्वेकर यांनी सांगितले.     

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होता. शिक्षकांकडून होणारे संस्कार प्रत्यक्ष शाळेत आल्यावर मिळतात. आता शाळा पुन्हा सुरू झाल्यात. मित्र-मैत्रिणी पुन्हा प्रत्यक्ष भेटतील. पालकांनी तुम्हाला शाळेत पाठवलं आहे तुम्ही सुदृढ राहीलात तर त्यांच्या मनात भिती राहणार नाही आणि समाजापुढेही मोठा संदेश जाईल.यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले.

दरम्यान, सकाळी महापौर नरेश म्हस्के आणि जिल्हाधिकारी नार्वेकर, शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ करण्यात आला. महापौरांच्या हस्ते घंटा वाजवून शाळा सुरू करण्यात आली. यावेळी झालेल्या छोटेखानी समारंभात महापौर आणि जिल्हाधिकारी यांनी शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगत अनेक आठवणी सांगितल्या. शिक्षकांचे संस्कार आहेत म्हणून शाळेचा एक विद्यार्थी महापौर झाला, असे म्हस्के यांनी सांगितले. जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत याचा आनंद असून शैक्षणिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या