शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोची कारशेड गोवे येथेच; नगरविकासचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 11:59 PM

ओवळ्याचे आरक्षण नामंजूर करण्याचे प्रताप

नारायण जाधव

ठाणे : ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ अंतर्गत विस्तारित ठाणे-भिवंडी-कल्याण या २४.९ किमीच्या मेट्रोमार्गावरील नियोजित कारशेड आता भिवंडी तालुक्यातील गोवे येथेच उभारण्यावर एमएमआरडीएच्या विनंतीवरून नगरविकास विभागाने स्थानिकांच्या हरकती आणि सूचना ऐकून २९ आॅगस्ट २०१९ रोजी शिक्कामोर्तब केले आहे.

यापूर्वी तिला ठाण्यातील ओवळा-कासारवडवली, कल्याण कृषी बाजार समितीसह कोन येथील काही घटकांनी विरोध केला होता. त्यानंतर, जानेवारी २०१८ मध्ये ती भिवंडी तालुक्यातील गोवे येथे उभारण्याचे निश्चित करून तसा प्रस्ताव एमएमआरडीएने नगरविकास विभागाकडे पाठविला होता.

ओवळा येथील आरक्षण नामंजूरयाशिवाय, नगरविकास विभागाने ठाणे शहरातील ओवळा येथील यापूर्वीच्या मेट्रो कारशेडसह संलग्न सुविधा आणि वाणिज्यवापरासाठी बदल करण्यास दिलेली मान्यता रद्द करून ठाणेकरांना दिलासा दिला आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील ४० मीटर रुंदीच्या रस्त्यासह हरित क्षेत्र आणि रहिवास क्षेत्र बाधित होत असून नव्याने २५ मीटर रुंद रस्त्याचे बांधकाम आणि ही अंदाजे १५ हेक्टर जमीन खासगी असल्याने तिच्या भूसंपादनाचा खर्च न परवडणारा असल्याचे कारण दिले आहे. मात्र, यापूर्वी ती आरक्षित करताना एमएमआरडीए आणि नगरविकास विभागाने याचा विचार केला नव्हता का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत असून यामागे काही बिल्डर आणि राजकारण्यांचे हित जपण्याचा नगरविकास आणि एमएमआरडीएचा प्रताप असल्याची टीका आता हे मंजूर केलेले आरक्षण नामंजूर करण्यामागे मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर होऊ लागली आहे.

दरम्यान, ठाणे-भिवंडी-कल्याण या २४.९ किमीच्या मेट्रोमार्गाच्या डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालासही राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मेसर्स डापोलोनिया एसपीए आणि मेसर्स टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या सल्लागारांनी तो तयार केला असून या मार्गासाठी त्यांनी सुमारे ८४१६ कोटी ५१ लाख इतका खर्च प्रस्तावित केला आहे.

ठाणे ते कल्याणदरम्यान या मार्गावर १७ स्थानके प्रस्तावित असून अहवालात कोन येथे मेट्रोची कारशेड प्रस्तावित केली होती. तत्पूर्वी ती कल्याण-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर करण्यात येणार होते. मात्र, या जागेवर कारशेड उभारल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्वच धोक्यात येऊन त्याचा त्रास शेतकऱ्यांना होणार असल्याने तिला तीव्र विरोध झाला होता. त्यानंतर, ती भिवंडी-कल्याण मार्गावरील कोन येथे उभारण्याचे ठरले. त्यासाठी १५ हेक्टर जागा लागेल, असे निश्चितही करण्यात आले. मात्र, त्यास विरोध होऊ लागल्यानंतर आता ती थेट एमएमआरडीएने अधिसूचित केलेल्या भिवंडी तालुक्यातील ६० गावांपैकी गोवे येथे करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, या जागेवर आता मेट्रो-रेल कार डेपो, संलग्न सुविधा आणि वाणिज्य वापरासह मॉल आणि तत्सम सुविधा उभारून एमएमआरडीए आपला खर्च वसूल करणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो