ठाण्यात रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळली; 11 कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 14:50 IST2018-10-29T12:27:12+5:302018-10-29T14:50:39+5:30
ठाण्यात रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळून 11 कामगार खाली पडल्याची घटना घडली आहे.

ठाण्यात रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळली; 11 कामगार जखमी
ठाणे : ठाण्यात रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळून 11 कामगार खाली पडल्याची घटना घडली आहे. या अपघातात काही कामगार गंभीर जखमीदेखील झाले आहेत. ठाणे पश्चिमेकडील बाळकुम येथील रुणवाल गार्डन सिटी येथील ही घटना आहे. जखमी कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सकाळी 10.20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
जखमी कामगारांची नावं
1) मोहम्मद शेख (वय 30 वर्ष)
2) मोहम्मद रॉयल शेख ( वय 21 वर्ष), ICUमध्ये दाखल
3) जमाल शेख (वय 50 वर्ष)
4) हसन अली (वय 24 वर्ष), ICUमध्ये दाखल
5) इक्तियार मोहम्मद (वय 20 वर्ष)
6) दुलाल सिंह (वय 35 वर्ष)
7) मनिरुद्धीन शेख (वय 27 वर्ष)
#Thane ठाणे : रुणवाल गार्डन सिटी येथे रंगकामाची परांचीतुटून 10 ते 11 मजूर खाली पडून जखमी झाले आहेत pic.twitter.com/VcKEdYy8qx
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) October 29, 2018