शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तीन हजार ७२३ रिक्षांवर  उगारला कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:36 IST

कोरोना नियमांचे उल्लंघन : वाहतूक पोलिसांचा दणका

 

n  लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी करणाऱ्या एक हजार ३३५ वाहनांविरुद्ध सहा लाख ६७ हजारांचा दंड आकारला आहे. तसेच कोरोनाचे नियम धुडकावून दोनपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या तीन हजार ७२३ रिक्षाचालकांविरुद्ध १८ लाख ६१ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी दिली.शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मेट्रो लाइन ४च्या कामासाठी मुख्य रस्त्यांवर बॅरीकेडिंग केली आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी होऊन सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. अशा वेळी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेला सेवा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये व्यावसायिकांनी त्यांची बंद वाहने सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी केली आहेत. त्यामुळेच सेवा रस्त्यावरील दुतर्फा वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतो. याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेकडेही अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेच रस्ते वाहतुकीस मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १ ते १८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये सेवा रस्त्यावरील तब्बल एक हजार ३३५ अनधिकृत उभ्या केलेल्या वाहनांच्या मालकांविरुद्ध ई-चलनाद्वारे, जामर्स आणि टोईंग व्हॅनद्वारे वाहतूक नियंत्रण शाखेच्या विविध पथकांनी सहा लाख ६७ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.पाेलिसांच्या या कारवाईने रिक्षाचालकांमध्ये घबराट पसरली असून यापुढेही अशीच कारवाई  सुरु राहणार असल्याचे संकेत वाहतूक शाखेने दिले.

सेवारस्ते वाहतुकीला मोकळे ठेवाnसेवारस्त्यांवर दुकाने तसेच इमारतीच्या बाजूला असलेल्या भागात वाहने उभी करण्यास मुभा आहे. मात्र, महामार्गालगतच्या भागात वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सेवा रस्ता वाहतुकीला मोकळा ठेवण्याचे आवाहनही पाटील यांनी या वेळी केले.nरिक्षाचालकांकडूनही चालकांशेजारी तसेच मागेही दोनपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राहण्यासाठी चालकासह तिघांनाच परवानगी आहे. त्यामुळे एका विशेष मोहिमेंतर्गत तीन हजार ७२३ रिक्षाचालकांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागांतील १८ युनिटने दंडात्मक कारवाई केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या