ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:08 IST2025-07-30T19:04:46+5:302025-07-30T19:08:23+5:30
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडामध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून नागरिकांनी रास्तो रोको आंदोलन केले.

ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये १८ वर्षीय तरुणाने रस्त्यावरील खड्ड्यामुळे जीव गमावला. तरुणी जीमसाठी घरातून बाहेर पडला, पण रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटारसायकल घसरली आणि तरुणाचा मृत्यू झाला. भिवंडी-वाडा रस्त्यावर ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यश राजेश मोरे (वय १८, रा. कवाड, मडक्याचा पाडा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. २० जुलै रोजी त्याचा अपघात झाला होता.
यश जीमला जाण्यासाठी घरातून निघाला होता. भिवंडी-वाडा रस्त्यावरून जात असताना त्याची दुचाकी खड्ड्यामुळे घसरली. त्यानंतर तो खाली पडला. या घटनेत तो जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू होते.
दहा दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या यश मोरेचा आज मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. ग्रामस्थांनी या घटनेसाठी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरले आणि त्याच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले.
मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन
यशचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून अपघात झालेल्या ठिकाणी आणण्यात आला. तिथे लोकांनी कंत्राटदाराविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. ठेकेदार आणि संबंधिक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.