शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने खळबळ, व्हिडिओही व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 5:21 PM

विधानसभेच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांचा समावेश करण्यात आल्याने त्याचा देखील त्रास राजकीय पक्षांना होत आहे

ठळक मुद्देबोगस नावे पालिका निवडणुकीत काढणे शक्य नसल्याने त्याच आधारावर निवडणुका घेतल्या जाणार असल्याने सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करीत बोगस मतदार संदर्भात आपला आक्षेप नोंदवत आहेत.

अंबरनाथ : अंबरनाथ नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून या मतदार यादीमध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप सर्वच पक्ष करीत आहे. त्यातच रिपाईचे माजी शहराध्यक्ष अजय जाधव यांनी थेट तहसिलदार आणि नायब तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे अंबरनाथ नगरपालिकेची मतदार यादी तयार करण्यासाठी विधानसभेच्या भाग क्रमांक प्रमाणे यादी फोडून मतदारांचा प्रभाग निहाय समावेश करण्यात आला आहे. मात्र हे करताना संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांन मार्फत आणि यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्फत मोठ्या प्रमाणात मतदारांचे का प्रभागातून दुसर्‍या प्रभागात स्थलांतर केल्याचे समोर आले आहे.  

विधानसभेच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांचा समावेश करण्यात आल्याने त्याचा देखील त्रास राजकीय पक्षांना होत आहे. बोगस नावे पालिका निवडणुकीत काढणे शक्य नसल्याने त्याच आधारावर निवडणुका घेतल्या जाणार असल्याने सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करीत बोगस मतदार संदर्भात आपला आक्षेप नोंदवत आहेत. एवढेच नव्हे तर अनेक मतदार यादी तयार करताना एका प्रभागातील नावे थेट दुसरा प्रभागात टाकून संबंधित कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. पालिकेची यादी तयार करताना कर्मचाऱ्यांचा चुकीचा भूर्दंड हा थेट निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना बसणार असल्याने आता इच्छुक उमेदवार आपापल्या स्तरावर संताप व्यक्त करताना दिसत आहे. यादीतील गोंधळाला नेमका जबाबदार कोण याचा शोध घेतला जात असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी शहराध्यक्ष अजय जाधव यांनी थेट या मतदार यादीतील गोंधळाला तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना जबाबदार धरीत त्यांना मतदार यादीतील गोंधळ न सोडवल्यास थेट गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात संतापजनक व्हिडिओ जाधव यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. त्यांच्या या धमकीमुळे निवडणुकीचे वातावरण गढूळ होत असल्याचे दिसत आहे. 

'' अजय जाधव यांच्या व्हिडिओ वरून त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे पुढील कारवाई पोलीस प्रशासनामार्फत केली जाईल. - तहसीलदार जयराज देशमुख

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथCrime Newsगुन्हेगारी