शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांपासून नळ बंद, शंभर रूपये बॅरल पाणी

By admin | Updated: February 24, 2016 03:05 IST

दळखण गावाकरीता पाणीपुरवठा जलस्वराज पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समितीमार्फत केला जातो. भातसा नदीच्या पात्रातून पाणी उचल करणाऱ्या पंपाच्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने

- मनीष दोंदे,  खर्डीदळखण गावाकरीता पाणीपुरवठा जलस्वराज पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समितीमार्फत केला जातो. भातसा नदीच्या पात्रातून पाणी उचल करणाऱ्या पंपाच्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसा पासून गावात पाणीपुरवठा होत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व मोठी धरणे शहापूर तालुक्यात आहे. परंतु, धरण उशाशी असतांनाही खर्डी नजिकच्या दळखण गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून शंभर रूपये बॅरल प्रमाणे त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.गावातील विहीरीमध्ये पाणी आहे. परंतु, नळ असल्याने ते भरण्यासाठी विहीरीवर सहसा कोणी जात नाही. मात्र, गेले चार दिवस नळ बंद असल्याने विहीरीवर पाणी भरण्यासाठी तुडुंब गर्दी पाहवयास मिळत आहे. त्यात विहीरीचेही पाणी तळाला गेल्याने येथिल ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय राहीला नाही. सध्या एक बॅरलला शंभर रु पये मोजावे लागत आहेत. यामुळे ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत असून त्याचा कधीही उद्रेक होण्याची भीती आहे. नदीच्या पाण्याची पातळी घटली असून पाणी खेचणाऱ्या पंपाची मोटर नादुरु स्त झाली आहे. दुरु स्ती साठी नाशिक येथे नेली होती. त्यामुळे चार दिवस पाणीपुरवठा बंद होता. मात्र लवकरच तो पूर्वरत होईल.- गजानन सरखोत, अध्यक्ष, जलस्वराज्य पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समिती, दळखण.