शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनच्या प्रस्तावांना स्थगिती

By admin | Updated: October 12, 2016 04:16 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस आगारांचा कायापालट करण्यासंदर्भात सोमवारी स्थायी समितीच्या सभेत दाखल झालेल्या प्रस्तावांना स्थगिती

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस आगारांचा कायापालट करण्यासंदर्भात सोमवारी स्थायी समितीच्या सभेत दाखल झालेल्या प्रस्तावांना स्थगिती देण्यात आली. आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सभापती संदीप गायकर यांनी यावेळी स्पष्ट केली.आगाराच्या व्यवस्थेकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने दलदलीची आगारे आणि मोडकळीस आलेली कार्यालये हे चित्र केडीएमटीच्या तिन्ही आगारांमध्ये पाहायला मिळते. वसंत व्हॅली आगाराचा भूखंड विकसित करणे, खंबाळपाडा आगारात अंतर्गत सुधारणा करणे याचबरोबर गणेशघाट आगारात लाद्या बसवणे, गटारासाठी व बस थांबण्यासाठी स्टॉपरची व्यवस्था करणे, फर्निचरसह डांबरीकरण करणे आदी कामांचे साडेचार कोटींचे प्रस्ताव मान्यतेसाठी सोमवारच्या स्थायी समितीच्या सभेत दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रस्ताव चर्चेला येताच, ज्या कंत्राटदाराला वसंत व्हॅली आगारातील डांबरीकरणाचे काम दिले आहे, त्याने इतरत्र खड्डे भरण्याची कामे योग्य प्रकारे केलेली नाहीत, असा मुद्दा सदस्य रमाकांत पाटील आणि प्रेमा म्हात्रे यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवात केलेली कामे निकृष्ट झाल्याने पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या कामांची पाहणी करावी व त्यानंतरच त्यांना बिले अदा करावीत, अशी सूचना सदस्यांनी केली. परिवहनच्या कामांच्या निविदा या कमी दराने आल्याचा मुद्दा ही यावेळी मांडण्यात आला. यावर संबंधित निविदाप्रकरणी सुरक्षा अनामत घेण्यात येते तसेच यावेळी पावसाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे खड्डे पडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कोणत्याही कंत्राटदाराला कामांची बिले अदा केलेली नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.दरम्यान, निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदाराला काळ््या यादीत टाकण्याचा सूचना करत आयुक्तांच्या चर्चेनंतरच प्रस्तावांबाबत निर्णय होईल, असे गायकर यांनी स्पष्ट केले.