शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

विशेष मुलांच्या ‘सोबती’ केंद्राचा रविवारी वर्धापन दिन; अनिल अवचट यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:03 PM

मदतीचे आवाहन, संस्थेत मुंबई-ठाणे परिसरातील १२० पालक सभासद

ठाणे : विशेष मुलांचे पुनर्वसन कसे करावे, याचे आदर्श उदाहरण असलेल्या सोबती संस्थेचा वर्धापन दिन १९ जानेवारीला वाडा तालुक्यातील तिळसा येथील निवासी केंद्रात साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट सोबती ला भेट देणार असून ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. समस्या आपली आहे, तर त्यावर उपायही आपणच शोधला पाहिजे, या भावनेने सोबती परिवारातील पालकांनी अखंड प्रयत्न आणि कष्टाने वाडा तालुक्यात देखणे, अद्ययावत निवासी संकुल साकारले आहे.

सोबतीतील पालकांपुढे दुहेरी आव्हान आहे. कारण, या परिवारातील मुले अंध आहेतच, शिवाय त्याचबरोबरीने स्वमग्नता, कर्णबधिरत्व, गतिमंदत्व, सेरेब्रल पाल्सी (मेंदूचा पक्षाघात) आदी व्याधीही आहेत. या समस्या भेडसाविणाऱ्या सर्व कुटुंबांनी एकत्र आले पाहिजे, या विचारातून सोबती संस्थेचा जन्म झाला. २००४ मध्ये सोबती पॅरेंट्स असोसिएशन या संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. सध्या संस्थेत मुंबई-ठाणे परिसरातील १२० पालक सभासद आहेत. २००७ मध्ये ठाण्यात एका विश्वस्त संस्थेच्या जागेत १०-१२ वर्षांवरील मुलामुलींसाठी सोबतीने व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले. प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलेमुली आपापल्या क्षमतेनुसार मणी ओवणे, कुटून मसाले बनविणे, वजन करणे, पॅकिंग करणे, घरघंटी चालविणे अशी कामे शिकली.

मुलांना उद्योगात ठेवणे महत्त्वाचे होतेच, पण त्याचबरोबर आपल्यानंतर मुलांचे काय, या चिंतेतून कायमस्वरूपी निवासी पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. माजी आमदार विवेक पंडित यांनी वाडा तालुक्यातील तिळसा येथील त्यांच्या मालकीची पाऊण एकर जमीन संस्थेला विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यानंतर वास्तू उभारण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी निधी संकलनाचे प्रयत्न सुरू केले.निवासी केंद्रात १५ मुलांचे वास्तव्यतीन वर्षांपूर्वी सोबतीचे हे निवासी केंद्र सुरू झाले. या केंद्रात मुले सोमवारी सकाळी येतात आणि पुढील पाच दिवस राहून शुक्र वारी दुपारी आपल्या घरी परत येतात. मुले आणि प्रशिक्षकांच्या सोयीसाठी बस सुविधा आहे. तिळसातील केंद्र अतिशय अद्ययावत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या केंद्रात सकाळी ७ पासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मुलांचे वेळापत्रक ठरवून देण्यात आले आहे. मुलांनी त्यांचे दात घासणे, प्रातर्विधी, अंघोळ, कपडे घालणे या दैनंदिन क्रि यांच्या बाबतीत जास्तीतजास्त स्वावलंबी व्हावे, यादृष्टीने केंद्रात प्रयत्न केले जातात. या निवासी केंद्रात सध्या १४ मुले आणि एक मुलगी असे १५ जण वास्तव्यास असून सहा प्रशिक्षक कायमस्वरूपी त्यांच्यासोबत असतात.