सुहास देसाई हे बौद्धिक विकलांग - आनंद परांजपे

By अजित मांडके | Published: October 27, 2023 06:29 PM2023-10-27T18:29:36+5:302023-10-27T18:31:05+5:30

उपरोधिक टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.

Suhas Desai is intellectually disabled - Anand Paranjape | सुहास देसाई हे बौद्धिक विकलांग - आनंद परांजपे

सुहास देसाई हे बौद्धिक विकलांग - आनंद परांजपे

ठाणे : जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बोलवून प्रत्यक्षात सुहास देसाई व शानू पठाण हे या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावरुनच त्यांची राजकीय विश्वासार्हता व राजकीय विद्वत्ता दिसून येते. शिवसेना प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी आणि घसरले माझ्यावर, यातुनच सुहास देसाई यांची बौद्धिक विकलांगता आढळून आली आहे तर शानू पठाण यांनी माझ्यावर आरोप करताना त्यांचे मराठी कच्चे असल्याचे दिसून आले. यामुळे मी काय बोललो ते त्यांनी प्रथम नीट समजून घ्यावे. मी माझ्याच नावाने पत्रकार परिषद घेतो असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.

शारिरीक विकलांग व्यक्तींबाबत आपणांस संवेदना व सहानुभूतीची भावना असते. पण सुहास देसाई यांनी माझ्यावर जे आरोप केले ते पाहता सुहास देसाई हे बौद्धिक विकलांग असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेना प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड यांचे छायाचित्र दाखविले, कायंदे यांना उत्तर देण्याऐवजी माझ्यावर घसरण्याची त्यांना गरज नव्हती.

नजीब मुल्ला यांचे सलमान फाळके याच्याबरोबरचे छायाचित्र पत्रकार परिषदेत दाखविले होते, हे छायाचित्र २०१७ साली नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला फाळके आला होता ते फेसबुकवरचे छायाचित्र आहे. आम्ही ते नाकारत नसल्याचेही ते म्हणाले.  तर शानू पठाण यांची मराठी कच्ची असल्याने त्यांना मी काय बोललो ते नीट समजलेले नसावे, माझे आजवरचे राजकीय आयुष्य हे निष्कलंक, स्वच्छ असल्ताने माझ्यावर राजकीय, आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.मी आजही राष्ट्रवादी मध्येच असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Suhas Desai is intellectually disabled - Anand Paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.