शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी उद्याचं राजकारण ताब्यात घ्यावं !

By admin | Updated: September 15, 2015 23:12 IST

समोर विद्यार्थी बसलेले असल्यामुळे मी राजकारणावर काही बोलणार नाही, पण तुम्ही खूप मोठे व्हा आणि राजकारण ताब्यात घ्या, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

डोंबिवली : समोर विद्यार्थी बसलेले असल्यामुळे मी राजकारणावर काही बोलणार नाही, पण तुम्ही खूप मोठे व्हा आणि राजकारण ताब्यात घ्या, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे केले. कल्याण-डोंबिवलीतील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डोंबिवलीतील शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटपाचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी हे वाटप करण्यात आले. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पणही याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मंत्र शिवसैनिकांनी आजही प्राणपणाने जपला आहे, असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले. शिवसेनेचे समाजकार्य शाखांच्या माध्यमातून २४ तास सुरू असते, असेही ते म्हणाले.महाराष्ट्राच्या भावी विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळखल्या जाणा-या कल्याण आणि डोंबिवली या शहरांमध्ये मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रमुख प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यात अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या जपानी बनावटीच्या अत्याधुनिक ५५ मीटर उंच शिडी असलेले अग्निशमन वाहन, आधारवाडी येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी), कल्याण स्पोर्ट्स क्लब येथील जलतरण तलाव, बैलबाजार येथे माजी कामगार मंत्री साबिरभाई शेख उद्यान, चिकणघर येथील उद्यान, डोंबिवली पूर्व येथील सार्वजनिक ग्रंथालयाची नवीन इमारत आदींचे लोकार्पण करण्यात आले. भाजपासह आयुक्तांनी फिरवली पाठ : या सर्व उपक्रमांना भाजपासह केडीएमसीच्या आयुक्तांनी अनुपस्थित होते. कल्याणच्या जलतरण तलावात पाणी कुठुन आले, महाराष्ट्रात दुष्काळ असतांना शिवसेना हे काय करत आहे. आगामी काळातील निवडणुकांमध्ये मतदार हे सर्व लक्षात ठेवतील असे, आमदार नरेंद्र पवार म्हणाले.