शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

१८४ इमारतींचेच स्ट्रक्चरल आॅडिट

By admin | Updated: January 22, 2016 03:27 IST

महापालिकेने पावसाळ््याची पूर्वतयारी म्हणून शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या

ठाणे : महापालिकेने पावसाळ््याची पूर्वतयारी म्हणून शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे बंधनकारक केल्यानंतर आतापर्यंत २,२८२ पैकी केवळ १८४ इमारतींचेच स्ट्रक्चरल आॅडिट केल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी आॅगस्टमध्ये नौपाड्याच्या बी केबीन भागातील कृष्ण निवास इमारत कोसळून १२ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. अशा इमारतींची यादीही पालिकेने जाहीर केली आणि २,२८२ इमारतींना नोटिसाही बजावल्या. त्यानंतर आतापर्यंत केवळ १८४ इमारतींनी त्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतले आहे. जुन्या इमारतीमधील रहिवाशांची ही उदासीनता महापालिकेसाठी काळजीचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, या इमारतींपैकी ५८ इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली, तरीही तेथील रहिवासी शांत आहेत.शहर विकास विभागाच्या नियमानुसार, ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्यांची दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. आॅडिटमध्ये इमारत धोकादायक आढळली आणि ती रहिवाशांनी दुरुस्ती केली नाही, तर तो भार महापालिकेला सांभाळणे शक्य नाही, तसेच मोठ्या प्रमाणात इमारती धोकादायक आढळल्यास आणि महापालिकेने त्यांच्यावर सरसकट कारवाई केल्यास, तेथील रहिवाशांना पर्यायी जागा देण्यासाठी महापालिकेकडे जागाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे रहिवाशांनी जागरूकतेने स्ट्रक्चरल आॅडिट आणि दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत महापालिका अधिकाऱ्याने व्यक्त केले. (प्र्रतिनिधी)