शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

झोपड्या पाडण्याच्या ठरावाविरोधात धडक मोर्चा

By admin | Updated: December 27, 2016 01:56 IST

ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला आहे. या ठरावाच्या निषेधार्थ कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे आमदार

ठाणे : ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला आहे. या ठरावाच्या निषेधार्थ कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कळवा नाका येथे धडक मोर्चाचे आयोजन केले होते. या झोपड्यांवर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी आव्हाड यांनी दिला.या ठरावाच्या निषेधार्थ सुमारे ३५ हजार झोपडीधारकांनी कळवा नाका येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला उद्बबोधन करतांना आव्हाड यांनी शिवसेना- भाजपवर चांगलीच टीका केली.ठामपाने ठाण्यातील झोपड्यांवर कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवून या कारवाईला स्थगिती मिळविली होती. मात्र, महासभेमध्ये सेना- भाजपने ठराव करु न या झोपड्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्याच निर्णयाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. मनिषा नगर, जानकीनगर, खारीगाव, घोलाईनगर, आतकोनेश्वर नगर येथील सुमारे ३० ते ३५ हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मनिषा नगरमधून या मोर्चाला सुरु वात झाली. एकाचवेळी खारीगाव, मनिषानगर, कळवा या भागातून मोर्चात नागरिक सहभागी झाल्यामुळे नवी मुंबई आणि रेतीबंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. आव्हाड यांनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. २००० पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचा कायदा असतांनाही ८० वर्षांपूर्वीच्या झोपड्या पाडण्याचा घाट घातला आहे. शहर सुंदर करण्याच्या नादात सत्ताधारी रहिवाशांना बेघर करीत आहेत. मात्र, या भागातील एकही झोपडी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरु. गोरगरिबांना बेघर केले तर ते बंड केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.