शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:46 IST

कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असून यासाठी बाहेरगावी गेलेले लोक गणेशोत्सवासाठी आपल्या गावात दाखल होतात. तेव्हा या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे आणि एसटी सज्ज असतात.

जयंत धुळप  अलिबाग : कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असून यासाठी बाहेरगावी गेलेले लोक गणेशोत्सवासाठी आपल्या गावात दाखल होतात. तेव्हा या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे आणि एसटी सज्ज असतात. यंदाच्या गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि उपनगरांतून किमान दीड लाख गणेशभक्त येत्या रविवार, २० आॅगस्टपासून कोकणातील आपापल्या गावी येणार आहेत. यासाठी तब्बल २ हजार २१६ एसटी बसेसमधून रवाना होणार आहेत. या सर्व गणेशभक्तांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोच करण्याची सेवा देण्याकरिता मुंबई एसटी विभागातील २५० एसटी बसेस बरोबरच पुणे, औरंगाबाद आणि नाशिक विभागातील प्रत्येकी ५०० याप्रमाणे एकूण १ हजार ७५० एसटी बसेस चालक आणि वाहकांसह सज्ज होत आहेत.मुंबई विभागातील अनेक चालक-वाहकांच्या घरी देखील गणेशाचे आगमन होत असल्याने, त्यांनाही सुट्टी देणे गरजेचे असते.अशा वेळी कमी पडणारी चालक-वाहकांची संख्या भरुन काढून कोकणातील गणेशभक्तांना विनाखंड प्रवासी सेवा देण्याकरिता औरंगाबाद विभागातून ८० चालक व ४० वाहक, नागपूर विभागातून ८५ चालक व ४५ वाहक तर अमरावती विभागातून ८५ चालक व ४० वाहक असे एकूण २५० चालक व १२५ वाहक मुंबईत दाखल होत आहेत. आगाऊ आरक्षित व ग्रुप बुकिंगच्या एकूण २ हजार २१६ एसटी बसेस येत्या २० आॅगस्टपासून सुरु होवून कोकणात एकूण सुमारे १ लाख १० हजार ८०० गणेशभक्त रवाना होणार आहेत. यातील १ हजार १२२ बसेस मुंबईतून, ८७३ बसेस ठाण्यातून तर २२१ बसेस पालघरमधून कोकणातील विविध गावांत जाणार आहेत.रविवारी २० आॅगस्ट रोजी कोकणात गणेशभक्तांना घेवून जाणाºया एसटी बसेसचा प्रवास सुरू होणार असून या पहिल्या दिवशी १३ बसेस रवाना होतील. सोमवार २१ आॅगस्ट रोजी ७१, मंगळवार २२ आॅगस्ट ३५३, बुधवार२३ आॅगस्ट रोजी सर्वाधिक म्हणजे १ हजार ५७५ बसेस तर गुरुवार २४ आॅगस्ट रोजी २०४ बसेस कोकाणात रवाना होत आहेत.भक्तीस्नेहाची परंपरा१आपल्या नोकरीच्या चौकटी पलीकडे जावून निभावलेले भक्तीस्नेहाचे नाते एसटी चालक आणि कर्मचाºयांचे आहे.२पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी-कार्तिकी वारी वा नाशिकचा कुंभमेळा त्यावेळी कोकणातला एसटी चालक-वाहक आपल्या एसटी बसेस घेवून नाशिक-पंढरपुरातल्या भक्तगणांच्या प्रवासी सेवेकरिता दाखल होतात.३तर कोकणचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या गणेशोत्सवाकरिता या चाकरमान्यांना त्यांच्या थेट गावी पोहोच करण्याकरिता विदर्भ-मराठवाड्यातील एसटी चालक आणि वाहक आपापल्या एसटी बसेस घेवून दाखल होतात.४गेल्या अनेक वर्षांपासूनची ही अनोख्या भक्तीस्नेहाची परंपरा आजही अबाधित आहे.ंचार ठिकाणी विशेष दुरुस्ती पथकेरायगड विभागातून जाणाºया गणेशभक्तांच्या सेवेकरिता रामवाडी (पेण) येथील रायगड विभाग देखील सज्ज झाला असल्याची माहिती रायगड एसटी विभागाचे वाहतूक अधिकारी संजय हर्डीकर यांनी दिली आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था असली तर एसटी बसमधून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाºया प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास वा असुधिवा होवू नये याकरिता एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे.प्रवासादरम्यान एसटी बस नादुरुस्त झाल्यास ‘रामवाडी(पेण) ते पोलादपूर’ या टप्प्यातील दुरुस्तीची जबाबदारी ठाणे विभागाकडे देण्यात आली असून त्यांच्याच माध्यमातून इंदापूर येथे दुरुस्ती पथक तैनात करण्यात येत आहे.पोलादपूर येथे दुरुस्ती पथक तैनात करून ‘पोलादपूर ते चिपळूण’ टप्प्याची जबाबदारी रायगड विभागाकडे सोपविण्यात आली आहे. संगमेश्वर येथे दुरुस्ती पथक तैनात करून ‘चिपळूण ते राजापूर’ टप्प्याची जबाबदारी रत्नागिरी विभागाकडे देण्यात आली आहे. तर तरळा येथे दुरुस्ती पथक तैनात करून ‘राजापूर ते सावंतवाडी’ या टप्प्याची जबाबदारी सिंधुदुर्ग विभागाकडे सोपविण्यात आली आहे.